ind vs aus test wtc final-2023-india-won 2-tests-australia-may-out lose-remaining-matches cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: भारताचा दबदबा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीतून ऑस्ट्रेलिया बाहेर?

सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार भारत!

Kiran Mahanavar

WTC Points Table : टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे पहिले 2 सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघाचे टेन्शन वाढले आहे. दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. त्याच वेळी 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पराभवासह संघाच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. सलग 2 पराभवांनंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, पण नंबर-2 टीम इंडियामधला फरक खूपच कमी झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ उर्वरित दोन्ही सामने हरला, तर तो अंतिम शर्यतीतूनही बाहेर पडू शकतो.

दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला 16 कसोटीनंतर 70.83 टक्के गुण होते. त्याने 10 जिंकले होते तर दोन हरले होते. त्यांचा हा तिसरा पराभव आहे. आता संघाला 66.67 टक्के गुण आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचे दुसऱ्या कसोटीपूर्वी 61.67 टक्के गुण होते. विजयानंतर त्यांच्या गुणात आणखी बारा टक्के वाढ झाली. आता भारताची 64.06 टक्के गुण आहेत. भारताने आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत. त्याचा हा 10वा विजय तर 4 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला तर त्याला 59.65 टक्के गुण मिळतील. श्रीलंकेचा संघ सध्या 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्धची शेवटची मालिका त्याला त्याच्या घरी खेळायची आहे. श्रीलंकेचा संघ दोन्ही सामने जिंकल्यास त्याला 61.11 टक्के गुण मिळतील आणि जेतेपदाच्या फेरीत प्रवेश करतील.

चारही सामने गमावूनही ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचू शकतो. जर श्रीलंकेने न्यूझीलंडवर 1-0 असा विजय मिळवला, तर त्याला 55.56 टक्के गुण होतील आणि तो बाहेर होईल. चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राविषयी बोलायचे झाले तर भारतीय संघाने फायनल गाठली होती, पण न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हरमध्ये अंतिम सामना खेळल्या जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT