IND vs AUS World Cup 2023 
क्रीडा

Ind vs Aus : आरंभ है प्रचंड! राहुल अन् विराटचा दणका, कांगारूला हरवून टीम इंडियाची विजयी सलामी

Kiran Mahanavar

IND vs AUS World Cup 2023 : आरंभ है प्रचंड! एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताने चार गडी गमावून 201 धावा केल्या आणि वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 200 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने 41.2 षटकात 4 गडी गमावत 201 धावा करत सामना जिंकला. कोहलीने 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या तर केएल राहुलने 115 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावांची खेळी केली. कोहली आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 165 धावांची भागीदारी केली.

200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाने 2 धावांच्या एकूण स्कोअरवर आपल्या 3 विकेट गमावल्या. मिचेल स्टार्कने भारतीय डावाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सलामीवीर इशान किशनला बाद केले. ईशानला खातेही उघडता आले नाही.

यानंतर जोश हेझलवूडने पहिल्याच षटकात रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला दुहेरी धक्का दिला. 6 चेंडू खेळूनही रोहितला खाते उघडता आले नाही. हेजलवूडने श्रेयस अय्यरला वॉर्नरकरवी झेलबाद करून भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयसला 3 चेंडूत एकही धाव करता आली नाही. हेजलवूडने 3 तर स्टार्कने एक विकेट आपल्या नावावर केली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कांगारूंची सुरुवात खराब झाली. कारण बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.

यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने 69 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी तोडली. वॉर्नरने 41 धावा केल्या. स्मिथ आणि लॅबुशेनने 36 धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला 46 आणि लॅबुशेनला 27 धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 119 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

15 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स 15 तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस, मिचेल स्टार्कने 28 धावा करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले.

भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT