Rohit Sharma sakal
क्रीडा

Rohit Sharma: 'प्रत्येक वेळी आठवण करून देण्याची गरज...' पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला

कोणता संघ जिंकेल, हे नंतर कळेल, पण या सामन्यापूर्वी भारतीय रोहित संतापला. ...

Kiran Mahanavar

Rohit Sharma Ind vs Aus WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत. 7 जूनपासून ओव्हल मैदानावर हा सामना खेळल्या जाणार आहे. कोणता संघ जिंकेल, हे नंतर कळेल, पण या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापला.

रोहितच्या भडकण्यामागचं कारण असा प्रश्न होता जो त्याला अनेकदा विचारला गेला आहे. खरं तर, ओव्हलमध्ये रोहित शर्माला आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबद्दल विचारण्यात आले, त्यानंतर भारतीय कर्णधाराने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले.

रोहित शर्मा म्हणाला की, टीम इंडिया मागील आयसीसी स्पर्धांमध्ये काय घडले याचा विचार करत नाही. यासोबतच रोहित शर्माने मीडियाला सल्ला दिला की, आयसीसीच्या टूर्नामेंटची वारंवार आठवण करून दिली नाही तर बरे होईल.

टीम इंडियाने गेल्या दहा वर्षांपासून आयसीसी टूर्नामेंट जिंकलेली नाही. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये इंग्लंडमध्ये जिंकली होती. भारताने इंग्लंडला हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला होता. पण यानंतर टीम इंडियाला प्रत्येक आयसीसी स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला.

2014 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला होता. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील भारताचा प्रवास संपुष्टात आला.

2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत टीम इंडिया बाहेर गेला. 2021 मध्येच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा पराभव झाला. म्हणजे टीम इंडियाने 7 आयसीसी स्पर्धा जिंकल्या नाहीत.

रोहित म्हणाला की, भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. ते जिंकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. मला माझ्या नेतृत्वाखाली 1-2 आयसीसी स्पर्धा जिंकायला नक्कीच आवडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT