ind vs aus wtc final 2023 team india-5-big-mistakes-top-order-collapse-rohit-sharma-virat-kohli pujara-fails
ind vs aus wtc final 2023 team india-5-big-mistakes-top-order-collapse-rohit-sharma-virat-kohli pujara-fails  sakal
क्रीडा

WTC Final: गल्लीत गोंधळ, ओव्हल मध्ये मुजरा! 'या' 5 चुकांमुळे टीम इंडिया बॅकफूटवर

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर दोन दिवसांच्या खेळानंतर बॅकफूटवर दिसत आहे. ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या या शानदार सामन्यात पहिल्या दिवशी गोलंदाजांनी निराशा केली, तर दुसऱ्या दिवशी घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांची लंडनच्या या मैदानावर ढेर झाली.

खेळाच्या दुस-या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले पण पुन्हा एकदा गोलंदाजांना शेपटीने केलेल्या धावा रोखण्यात अपयश आले. एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 425 पर्यंत जाईल असे वाटत होते, परंतु पॅट कमिन्स आणि अॅलेक्स केरी यांनी ती 469 पर्यंत नेली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दिवसअखेर 151 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या.

आता प्रश्न पडतो की अशा कोणत्या मोठ्या चुका होत्या ज्यांमुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली. भारताची आघाडीचे फलदाज केवळ 71 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या 48 धावांच्या खेळीमुळे त्याने अजिंक्य रहाणेसह 71 धावांची भर घातली. ही भागीदारी छान दिसत असताना नॅथन लायनने त्याला स्लिपमध्ये झेलबाद करून भारताला पाचवा आणि मोठा धक्का दिला. दिवसअखेर केएस भरत 5 आणि अजिंक्य रहाणे 29 धावा करून खेळत होते.

खेळपट्टी चुकीचा अभ्यास

भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार खेळपट्टीचा नीट अभ्यास करण्यात अपयशी ठरले असावेत हे सर्वात मोठे कारण आहे. ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी धावा लूटल्या, तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी घातक गोलंदाजी केली. गेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्येही असेच घडले होते.

टीम कॉम्बिनेशन

एकीकडे संघाचा कर्णधार आणि कोच खेळपट्टीचा अभ्यास करण्यात चुकले कर दूसरीकडे संघ कॉम्बिनेशनतही छेडछाड करण्यात आली. जगातील नंबर वन आणि भारताचा सध्याचा सर्वाधिक विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन या सामन्यात घेतला नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

कसोटी सामन्यांमध्ये संघ चौथ्या डावात खेळणे टाळतात असे अनेकदा सांगितले जाते. इंग्लंडमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा विक्रमही कसोटीत खराब आहे. याआधी संघ 38 पैकी 20 वेळा पराभूत झाला आहे आणि केवळ तीन वेळा जिंकला आहे. तरीही या मोठ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

उमेश यादवची गोलंदाजी

उमेश यादवने पहिल्या डावात टीम इंडियाला नाराज केले. त्याच्याकडे काही चांगले स्पेल होते पण सातत्याचा अभाव पूर्णपणे दिसत होता. अशा स्थितीत टीम इंडियाच्या चौथ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय पहिल्या डावात पूर्णपणे फ्लॉप दिसत होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीनने सुरुवातीला पुजाराला क्लीन बॉलिंग करून मोठे यश मिळवून दिले.

फलंदाजांच्या जुन्या चुका

टीम इंडियाचे फलंदाज गेल्या काही वर्षांत फक्त पाटा खेळपट्ट्यांवर धावा करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये घरच्या मैदानावरही टीम इंडियाचे फलंदाज वळणावळणाच्या ट्रॅकवर थैमान घालत होते. शेवटच्या कसोटीत अहमदाबादमध्ये फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी सापडली तेव्हा सर्वांनी तिथे धावा केल्या.

याशिवाय दर्जेदार वेगवान आक्रमणासमोर भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो बराच काळ सुरू आहे. मग तो कोहली असो, रोहित, पुजारा असो किंवा उगवता स्टार शुबमन गिल असो. ज्याप्रकारे सर्वांची निराशा झाली, त्यामुळे हे खेळाडू घरचे आणि पाटा खेळपट्ट्यांचेच किंग आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT