ind vs aus wtc final 2023 team india-playing-11-rohit sharma-r ashwin cricket news in marathi  
क्रीडा

Ind vs Aus : '...अश्विन खेळणार नाही', WTC Final आधी रोहित शर्माचे Playing 11बद्दल मोठं वक्तव्य

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळल्या जांणार आहे. या मेगा मॅचच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला.

यादरम्यान, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की रोहित प्लेइंग 11 आणि टीम बॅलन्सवर काय म्हणतो. तसेच मंगळवारी सराव करताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सध्या पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधाराने दुखापतीबाबत कोणतेही अपडेट दिले नसून तो आरामात दिसत होता.

अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर चिंता आहे ती म्हणजे दोन फिरकी गोलंदाज की चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचं. रोहितला संघातील संतुलनाबद्दल विचारण्यात आले, तो कोणत्या समीकरणासोबत जाणार. त्याला अश्विनबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला. रोहित शर्माने स्पष्ट उत्तर दिले.

मात्र, भारतीय कर्णधाराने प्लेइंग 11 उघड केली नाही. पण अश्विन खेळणार नाही, असे तो म्हणत नाही, असे त्याने निश्चितपणे सांगितले आहे. त्याच्या मते अनुभवी फिरकीपटूबाबतचा निर्णय शेवटच्या दिवशीच घेतला जाईल. खेळपट्टीबाबत रोहित म्हणाला की ती दिवसेंदिवस बदलत आहे.

अश्विनला वगळणे हा कठीण निर्णय असेल का, असे रोहितला विचारले असता, त्याने अश्विन खेळणार नाही असे मी म्हटल नाही, असे स्पष्ट उत्तर दिले. आम्हाला थांबावे लागेल कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की खेळपट्टी खरोखरच दिवसेंदिवस बदलत आहे. आजची खेळपट्टी उद्या वेगळी दिसत आहे.

त्यामुळे सर्व 15 खेळाडूंना एक स्पष्ट संदेश आहे की प्रत्येकाने खेळण्यासाठी तयार रहावे. खेळपट्टीवर आता गवत दिसत आहे आणि जर सकाळी ढगाळ वातावरण असेल तर अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह आत जाणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळला तर अश्विनच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. रोहितने हातवारे करत उत्तर दिले. कारण रवींद्र जडेजाला त्याच्या फलंदाजीमुळे अश्विनपेक्षा प्राधान्य मिळणार आहे.

रोहित शर्माला ओव्हलच्या खेळपट्टीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, मी काल खेळपट्टी पाहिली, वेगवान गोलंदाजांना थोडी मदत होईल असे नक्कीच वाटत आहे. ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाज थोडे प्रभावी ठरू शकतात. जूनमध्ये इथे फारसे क्रिकेट खेळले जात नाही असे आपण ऐकतो. येथे काउंटी सामने खेळले जातात. दोन आठवड्यांपूर्वी येथे सामना खेळल्याचे आम्ही पाहिले. या मैदानावर या मोसमातील हा पहिलाच सामना असेल असे नाही.

पुढील पाच दिवसांत परिस्थिती कशी आहे आणि काय होणार आहे, याची आपल्याला चांगलीच कल्पना आहे. त्याच वेळी भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले की, आपल्याला मागील फायनलमधील चुकांची पुनरावृत्ती करायला आवडणार नाही. यावेळी तो विशेष रणनीती घेऊन उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT