Steve Smith Record sakal
क्रीडा

WTC Final Steve Smith : 4,4... दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच स्मिथचा भारताविरुद्ध शतकी दणका!

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final Steve Smith : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी तुम्ही ट्रॅव्हिस हेडचे शतक ठोकले आता दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथनेही शतक झळकावले. अशाप्रकारे तो WTC फायनलमध्ये शतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनला आहे. दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला तेव्हा तो 95 धावांवर नाबाद होता. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर स्मिथने दोन चौकार मारून शतक ठोकले. या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे.

भारताविरुद्ध WTC फायनलमध्ये शतक झळकावून, स्टीव्ह स्मिथने ICC बाद फेरीतील 8 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. याआधी 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत त्याने शतक झळकावले होते.

स्टीव्ह स्मिथने WTC फायनलमध्ये झळकावलेले कसोटी शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक आहे, जे त्याने 229 चेंडूंचा सामना करताना पूर्ण केले. इंग्लंडमध्ये त्याच्या बॅटमधून झळकलेले हे 7 वे कसोटी शतक आहे. त्याचवेळी त्याने भारताविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील 9वे शतक झळकावले.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या चेंडूवर आपल्या शतक ठोकले. त्याने पहिला चेंडू खेळला, ज्यावर त्याने चौकार मारला, त्यानंतर पुढच्या चेंडूवर एकच धाव घेतली आणि त्याचे शतक पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT