IND vs BAN 2nd Test sakal
क्रीडा

IND vs BAN 2nd Test : विराटने घातलेला गोंधळ अय्यर-अश्विनने सावरला; भारत हरता हरता जिंकला

Kiran Mahanavar

India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या गेला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट क्रीजवर होते. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा केल्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याच्यानंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात 93 धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतला दुसऱ्या डावात केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. मेहदी एवढ्यावरच थांबला नाही. अक्षर पटेलला क्लीन बॉलिंग देत त्याने डावातील पाचवे यश मिळविले. अक्षरने 69 चेंडूत 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

74 धावांवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या तेव्हा बांगलादेश चमत्कार करू शकेल असे वाटत होते. भारतीय संघ दडपणाखाली होता. येथून श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने डाव सांभाळला. आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून दोघांनी 71 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. अश्विन 62 चेंडूत 42 तर श्रेयस अय्यरने 46 चेंडूत 29 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जे भारताने चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT