rahul dravid celebration on ishan kishan double century sakal
क्रीडा

IND vs BAN: इशानच्या द्विशतकानंतर राहुल द्रविड बनला 'इंदिरानगर का गुंडा', व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

Rahul Dravid Celebration On Ishan Kishan Double Century : यष्टीरक्षक फलंदाज 24 वर्षीय इशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला. या स्फोटक खेळीनंतर हा युवा डावखुरा फलंदाज वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू बनला आहे. इशानने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. युवा खेळाडूच्या या पराक्रमानंतर संपूर्ण भारतीय संघ आनंदात वावरताना दिसला. यादरम्यान कॅमेरा ड्रेसिंग रूमकडे वळला, तेव्हा इंदिरानगर का गुंडा राहुल द्रविड सिंहासारखा गर्जना करताना दिसला.

जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर 24 वर्षीय इशानने 35व्या षटकात एकेरीसह दुहेरी शतक पूर्ण करताच, प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या खुर्चीवरून उठला आणि मोठ्याने गर्जना केला. हे अद्भूत दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यादरम्यान, मैदानावर इशानने नव्हे तर राहुल द्रविडनेच दुहेरी शतक झळकावल्यासारखे वाटले. शांत आणि गंभीर दिसणारा राहुल द्रविड इंदिरानगर का गुंडा का म्हणतात... IPL 2021ला सोशल मीडियावर #IndranagarKaGunda या नावाने ट्विटरवर ट्रेंड झाला होता. त्यावेळीस राहुल एका जाहिरातीत स्वत:ला 'इंदिरानगर का गुंडा' म्हणताना दिसला होता.

इशानच्या द्विशतकाचा संपूर्ण भारतीय संघाने आनंद साजरा केला. इशानसोबत विराट मैदानावर होता. सहकारी खेळाडूच्या यशाचा आनंद किंग कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इशानचे द्विशतक पूर्ण होताच विराटनेही खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. तो त्याच्या ज्युनियर खेळाडूसोबत भांगडा करताना दिसला. या व्हिडिओने चाहत्यांची मनेही जिंकली आणि चाहत्यांनी तो व्हायरलही केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT