IND vs BAN Playing-11
IND vs BAN Playing-11 sakal
क्रीडा

IND vs BAN Playing-11: बांगलादेश मध्ये भारतीय संघाची दहशत! रोहित 'या' खेळाडूसोबत उतरणार मैदानात

Kiran Mahanavar

India vs Bangladesh 1st ODI :  भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या रविवारी मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे. उद्या सकाळी 11.30 वाजल्यापासून पहिला एकदिवसीय सामना सुरू होईल. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा म्हणून तर स्टार फलंदाज विराट कोहलीही पुनरागमन करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये घातक खेळाडूंना संधी देणार आहे, ज्यामुळे बांगलादेश क्रिकेट संघाच्या कॅम्पमध्ये घबराट पसरेल आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत मैदानात उतरणार असलेल्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया.

कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये सलामी करताना दिसतील. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेही स्फोटक फलंदाजीत माहिर आहेत आणि कधीही सामना फिरवू शकतात. मधल्या क्रमांकामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. या वनडे मालिकेत मिस्टर 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधार केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाईल. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. ऋषभ पंत यष्टिरक्षकाची भूमिका साकारणार आहे.

सातव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेलला संधी दिली जाणार आहे. तर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला जाईल. मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि दीपक चहर यांना वेगवान गोलंदाज म्हणून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य Playing-11

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, दीपक चहर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT