Rohit Sharma  
क्रीडा

Rohit Sharma : पराभवानंतर रोहित खेळाडूंवर संतापला! 'कसे सुधारू यांना...'

मेहदी हसन मिराजने शानदार बॅटिंग करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.

Kiran Mahanavar

Rohit Sharma India vs Bangladesh : बांगलादेश दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला विजयी सुरुवात करता आली नाही. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने त्याचा पराभव केला. 186 धावा करूनही टीम इंडिया मॅच जिंकू पाहत होती पण मेहदी हसन मिराजने शानदार बॅटिंग करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघावर संताप व्यक्त केला आहे.

सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हा खूप जवळचा सामना होता. सामन्यात पुनरागमन करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न केला. आमची फलंदाजी खराब होती पण गोलंदाजी उत्कृष्ट होती. आम्ही बांगलादेशच्या खेळाडूंवर शेवटपर्यंत दबाव ठेवला. तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही विकेट्स घेतल्या आहेत. जास्त धावा करता आल्या नाहीत. आणखी 30-40 धावा झाल्या असत्या तर नक्कीच फरक पडला असता. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही चमकदार खेळ केला.

'हिट मॅन' पुढे बोलताना म्हणाला की, 'दुर्दैवाने मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्या, त्यानंतर पुनरागमन करणे कठीण झाले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. फलंदाजी कशी करायची हे समजून घ्यायला हवे. आम्हाला या परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. अशा परिस्थितीत फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी कशी करायची ते पाहावे लागेल. संघातील खेळाडूंमध्ये सुधारणा कशी होईल हे मला माहीत नाही, हे सर्व दबाव हाताळण्याबद्दल आहे. दबाव कसे हाताळायचे हे एकदा कळले की ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अशा परिस्थितीत दबावाचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. पुढील सामन्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बंगाल ते आसाम... ५ राज्यांचा निकाल आज! कोण जिंकणार सत्ता? निकाल कुठे आणि किती वाजता पाहणार?

Spider Species Discovery: ‘मोग्रस पुणे’सह कोळ्यांच्या चार नव्या प्रजातींचा शोध, पिंपरी चिंचवडमधील उद्यानात जैवविविधता सर्वेक्षणावेळी संशोधन!

Breakfast Special Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा आंबट-गोड कैरी स्प्रेड; चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव

Highway Traffic jam: महामार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा ‘शो’; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, अन्यही मार्गावर संथ गती!

स्मार्ट गुंतवणूक : लिक्विड म्युच्युअल फंड

SCROLL FOR NEXT