India vs Bangladesh Test Series LIVE Streaming sakal
क्रीडा

IND v BAN: कसोटी सामन्याची वेळ बदलली; टीव्ही अन् मोबाईलवर अशाप्रकारे सामने पहा थेट

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Test Series LIVE Streaming : भारत आणि बांगलादेशचे क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेनंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारपासून 14 डिसेंबरला खेळला जाणार आहे. एकदिवसीय 3 सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या 72 व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर यजमान बांगलादेशला मालिकेत क्लीन स्वीप करण्यापासून रोखले. एकदिवसीय सामने सकाळी 11.30 वाजल्यापासून खेळवले गेले परंतु कसोटी सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया चषक टी-20 विश्वचषक आणि आता वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ कसोटीत उतरणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतूनही बाहेर होता. कसोटी मालिकेतही त्याचे खेळणे संशयास्पद आहे. त्याच्या जागी केएल राहुल पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश मधील 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कधी आणि कोठे खेळला जाईल?

    भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारपासून 14 डिसेंबरला चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना किती वाजता खेळला जाईल?

    भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता खेळला जाईल. टॉस अर्धा तास आधी होईल.

  • दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे ?

    सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT