Ravichandran Ashwin-Ravindra Jadeja sakal
क्रीडा

Ind vs Eng : भारतीय भूमीवर हे पहिल्यांदाच घडलं; खराब गोलंदाजीमुळे अश्विन-जडेजाच्या नावावर झाला लज्जास्पद विक्रम

India vs England Series News 2024 :

Kiran Mahanavar

R Ashwin-Ravindra Jadeja :

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दुसऱ्या डावात चांगलेच महागात ठरले. या दोन्ही गोलंदाजांविरुद्ध ओली पोप आक्रमक खेळला आणि खूप धावा केल्या. भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन-जडेजाची जादू चाली नाही असे फारच क्वचित पाहायला मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात खराब गोलंदाजीमुळे अश्विन-जडेजाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय भूमीवर कोणत्याही विरोधी संघाच्या दुसऱ्या डावात एकत्रितपणे 100 हून अधिक धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात 126 धावा दिल्या. तर जडेजाने 131 धावा दिल्या. याआधी अश्विन-जडेजा यांनी भारतीय भूमीवर कोणत्याही संघाच्या दुसऱ्या डावात 100-100 धावा दिल्या नव्हत्या. आता त्याच्या नावावर हा वाईट विक्रम पण जमा झाला आहे.

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये गणले जातात. या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. अश्विन आणि जडेजाने आतापर्यंत भारतासाठी 50 कसोटी सामन्यांमध्ये मिळून 509 बळी घेतले आहेत. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ही जोडी पहिल्या क्रमांकावर आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत 246 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 436 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली आणि 190 धावांची आघाडी घेतली. यावरून टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण इंग्लंडसाठी ऑली पोप आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. ओली पोप 196 धावा करून बाद झाला. याशिवाय बेन डकेटने 47 आणि जॅक क्रॉलीने 31 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT