India vs England Series 2024 Marathi News sakal
क्रीडा

IND vs ENG : इंग्लंड तो गयो... 3 फिरकीपटू अन् 2 धाकड गोलंदाज! जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Kiran Mahanavar

India vs England Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडने आधीच त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यासाठी तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला. विकेटकीपर म्हणून केएस भरतवर विश्वास व्यक्त केला आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांना फिरकीपटू म्हणून संधी मिळाली आहे. विराट कोहली या सामन्यात खेळत नाही. त्याने पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचवेळी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामी करताना दिसणार आहेत. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. संघात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाज असतील. या दोघांनी गेल्या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली.

बेन फॉक्सलाही इंग्लंडकडून संघात स्थान देण्यात आले आहे. म्हणजेच तो संघासाठी विकेटकीपिंग करेल आणि जॉनी बेअरस्टो संघात फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. जो रूटचाही संघात समावेश आहे. टॉम हार्टली वगळता इतर सर्व खेळाडू याआधी इंग्लंडकडून खेळले आहेत. म्हणजेच हार्टले या सामन्यात पदार्पण करताना दिसणार आहे. या सामन्यात इंग्लंड बेसबॉलचा कसा वापर करतो हे पाहणे रंजक ठरेल.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन) : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT