virat 
क्रीडा

IND vs ENG - विराट-इशानची अर्धशतकं; भारताचं दमदार कमबॅक

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवलं होतं. भारताने तीन गड्यांच्या मोदल्यात हा सामना जिंकला. इशान किशन आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत एक एक अशी बरोबरी केली आहे. 

तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या होत्या. सलामीवीर जेसन रॉयची ४६ धावांची खेळी आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली पण जेसन रॉयने आधी डेव्हिड मलानबरोबर, नंतर जॉनी बेअरस्टोसोबत भागीदारी करत संघाला शंभरीपार पोहोचवले. जेसन रॉयचं सलग दुसरं अर्धशतक हुकलं. पहिल्या सामन्यात ४९ तर आजच्या सामन्यात तो ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॉर्गन आणि स्टोक्स यांनी फटकेबाजी करत संघाला १६४पर्यंत मजल मारून दिली. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने २-२ तर चहल, भुवनेश्वरने १-१ गडी टिपला.

Updates - 

इंग्लंडने दिलेलं 165 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुल दुसऱ्याच षटकात बाद झाला. 

केएल राहुल बाद झाल्यानंतर इशान किशनसोबत विराटने संघाचा डाव सावरला. इशान किशनने अर्धशतकी खेळी केली. भारताच्या 92 धावा झाल्या असताना तो पायचित झाला. 

इशान किशननंतर मैदानात आलेल्या पंतनेसुद्धा फटकेबाजी केली. मात्र 26 धावांवर खेळत असताना खराब फटका मारून झेलबाद झाला. पंत बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 13.4 षटकात तीन बाद 130 अशी झाली होती. 

विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत श्रेयस अय्यरसोबत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात मुंबई इंडियन्स संघाच्या दोन नवख्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. इशान किशन आणि सूर्य़कुमार यादव या दोन खेळाडूंना भारताने संघात स्थान दिले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू अक्षर पटेल या दोघांच्या जागी नव्या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

स्पोर्ट्सच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 इंग्लंड २० षटकात ६ बाद १६४; भारतापुढे १६५ धावांचे आव्हान

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत (१४२-५) : कर्णधार इयॉन मॉर्गन चांगली सुरूवात मिळाल्यावर बाद झाला. २८ धावांवर मॉर्गन झेलबाद झाला.

इंग्लंडला चौथा धक्का (११९-४) : फटकेबाज खेळाडू जॉनी बेअरस्टो २० धावा काढून बाद झाला; सूर्यकुमारने त्याचा झेल टिपला.

इंग्लंडला तिसरा धक्का (९१-३) : दमदार खेळी करणाऱ्या जेसन रॉयचं अर्धशतक हुकलं; ४६ धावांवर तो झेलबाद झाला.

इंग्लंडला दुसरा धक्का (६४-२) : अर्धशतकी भागीदारीनंतर डेव्हिड मलान बाद; २४ धावांवर युझवेंद्र चहलने पायचीत केलं.

पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का (१-१) : जोस बटलर शून्यावर माघारी; भुवनेश्वर कुमारने पायचीत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : म्हैसूर दसरोत्सव उद्‍घाटन वाद सर्वोच्च न्यायालयात; आज सुनावणी

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT