Sachin Tendulkar on Shubman Gill  sakal
क्रीडा

Shubman Gill Ind vs Eng : 'योग्य वेळी शुभमन गिलनं....' शतकी खेळीनंतर सचिनने थोपटली पाठ

Sachin Tendulkar on Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात

Kiran Mahanavar

India vs England Series News 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने 255 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले.

त्यानंतर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरही गिलच्या खेळीचे कौतुक करताना दिसला. सचिनशिवाय चाहतेही गिलच्या शतकाचे कौतुक करत आहेत. गिलचे शतकही खास आहे कारण याआधी तो धावा काढण्यासाठी सतत धडपडत होता.

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही गिल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पण जेम्स अँडरसनचा चेंडू गिलच्या बॅटची बाहेरची कड घेऊन यष्टिरक्षकाकडे गेला. गिलने पहिल्या डावात 34 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावर त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून आला. गिलने एकही वाईट शॉट खेळला नाही, आणि शानदार शतक केले.

यानंतर सचिन तेंडुलकरही सोशल मीडिया 'X' वर गिलच्या शतकाचे कौतुक करताना दिसला. सचिन तेंडुलकरने लिहिले, 'गिलची ही खेळी कौशल्याने भरलेली होती, गिलला त्याच्या शतकाबद्दल अभिनंदन (This innings by Shubman Gill was full of skill! Congratulations on a well timed 100!).

शुभमन गिलने 13 डावांनंतर हे शतक ठोकले. याआधी तो सातत्याने धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. त्यामुळे यांच्यावर सर्वत्र टीका होत होत्या. मात्र गिलच्या या शतकानंतर त्याचे टीकाकारही शांत झाले आहेत. मात्र, गिल फॉर्मात आल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्याकडून अशाच चमकदार खेळीची अपेक्षा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT