Ind vs Eng 3rd Test BCCI Set to Announce India Squad Cricket News in Marathi  sakal
क्रीडा

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! जडेजाने दिले दुखापतीबद्दल अपडेट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची करणार घोषणा

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. जडेजा मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात जखमी झाला होता. त्यानंतर जडेजाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावे लागले. सध्या, जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) बेंगळुरू येथे पुनर्वसन करत आहे.

बीसीसीआय तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. दरम्यान, जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करून दुखापतीबाबत ताजी माहिती दिली आहे. रवींद्र जडेजाने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 7 फेब्रुवारीला शेअर केला होता. जडेजाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, तो बरा होत आहे. मात्र, रवींद्र जडेजा टीम इंडियात कधी परतणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत विराट कोहली बाहेर होता. त्यानंतर आता विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर तो पाचव्या सामन्यातही खेळणे जवळपास अनिश्चित आहे. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलही तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करू शकतो.

केएल राहुललाही मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. यानंतर केएल राहुललाही दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावे लागले. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलही पुनरागमन करू शकतो, अशी अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली होती. पहिल्या डावात केएल राहुलने शानदार फलंदाजी करत 86 धावा केल्या. दुसऱ्या डावात केएल राहुलच्या बॅटमधून 22 धावा आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT