KL-Rahul-Overton 
क्रीडा

IND vs ENG: दुसऱ्या डावातही राहुल अपयशी; रोहितवर भारताची मदार

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test Day 3: इंग्लंडची पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी

Ind vs Eng 3rd Test Day 3 Live Updates: यजमान इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाची दुसऱ्या डावाची सुरूवातही खराब झाली. सुमारे १५ षटके खेळून काढल्यानंतर लोकेश राहुल ८ धावा काढून बाद झाला. त्याने ५४ चेंडूंचा सामना केला पण त्याला डाव सावरता आला नाही. ओव्हरटनच्या आऊटस्विंग चेंडूवर तो बाद झाला आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला. उपहाराची विश्रांती घेताना रोहित नाबाद २५ धावांवर खेळत होता.

इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताचा डाव ७८ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. रॉरी बर्न्स (६१) आणि हमीद हसीब (६८) हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलानने डाव सांभाळला. या दोघांनी १३९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडं मोडलं. रूटने मालिकेतील तिसरं शतक (१२१) ठोकले. मलाननेही ७० धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. ओव्हरटनच्या ३२ धावांमुळे इंग्लंडने ४००चा टप्पा पार केला, पण अखेर त्यांचा डाव ४३२ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीने ४ तर बुमराह, जाडेजा, सिराजने २-२ बळी घेतले.

त्याआधी, लीड्ससारख्या गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा विराटचा निर्णय फसला. लोकेश राहुल पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारानेही निराशा केली. कर्णधार विराटकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो १७ चेंडूत ७ धावा काढत बाद झाला. मुंबईकर अजिंक्य रहाणेला चांगली सुरूवात मिळाली होती, पण त्यालाही १८ धावांवर बाद करण्यात आले. दुसऱ्या सत्रात तर भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. केवळ २२ धावांमध्ये भारताने सहा बळी गमावले. ऋषभ पंत (२), रोहित शर्मा (१९), मोहम्मद शमी (०), जसप्रीत बुमराह (०), रविंद्र जाडेजा (४) पटापट बाद झाले. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हटनने ३-३ तर सॅम करन, ओली रॉबिन्सनने २-२ गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT