Virat-Kohli-R-Ashwin 
क्रीडा

IND vs ENG: म्हणून अश्विनला संघात घेतलं नाही- विराट कोहली

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test at Leeds: भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी विराटला संघाबद्दल विचारले असता विराटने संघात कोणताही बदल नसल्याचे सांगितले. गेले कित्येक दिवस रविचंद्रन अश्विनला संघात स्थान द्यावे अशी मागणी विविध स्तरातून होत असतानाही त्यासा संघात स्थान का देण्यात आलेले नाही? असा सवाल उत्सुकता म्हणून टॉसच्या वेळी विराटला विचारण्यात आला. त्यावर विराटने अतिशय समर्पक उत्तर दिले.

अश्विनला संधी न देण्याचं कारण म्हणजे...

"इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विनला संघात संधी द्यावी असा विचार आमच्या साऱ्यांचाच मनात आला होता. पण असे असले तरी टॉस जिंकणं आणि हारणं हे आपल्या हातात नसतं. तसेच, चौथ्या वेगवान गोलंदाजाची गरज संघाला लागते हे आम्ही गेल्या दोन सामन्यात पाहिलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही जोखीम उचलून चालणार नव्हती. संघात रविंद्र जाडेजा आहे. लीड्सच्या मैदानावर जर फिरकीला मदत मिळत असेल तर जाडेजा नक्कीच गेल्या दोन सामन्यांपेक्षा जास्त षटके टाकू शकतो आणि आम्हाला अपेक्षित निकाल मिळवून देऊ शकतो. अशा परिस्थितीत जोखीमीचा असलेला अश्विनला संघात घेण्याचा निर्णय आम्ही टाळला आणि जो संघ खेळतो आहेत त्याच संघाला मैदानात उतरवले", अशा शब्दात विराटने अश्विनला संघात न घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

भारत १९ वर्षांनंतर लीड्सच्या मैदानावर

२००२ नंतर तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय संघ या मैदानावर कसोटी सामन्यासाठी उतरला. गेल्या काही वर्षात हे मैदान गोलंदाजीसाठी पोषक असल्याने या मैदानावर प्रथम फलंदाजी करणे हा धाडसी निर्णय असल्याचे जाणकारांचे मत होते. सामन्याआधी बहुचर्चित असलेला खेळाडू रविचंद्रन अश्विन याला संघात स्थान देण्यात आले नाही. रविंद्र जाडेजाकडून तिसऱ्या सामन्यात गेल्या दोन सामन्यांपेक्षा जास्त षटके टाकली जातील, असे विराटने टॉसच्या वेळी सांगितले. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत जाडेजाच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच विशेष लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT