IND vs ENG Twitter
क्रीडा

Wicket please! जड्डूच्या बॉलिंग वेळी 'टाईट फिल्डिंग'

जाडेजाने इंग्लंडच्या सलामीवीराला तंबूचा रस्ता दाखवत भारतीय संघाची डोकेदुखी बऱ्यापैकी कमी केली.

सुशांत जाधव

England vs India, 4th Test : इंग्लंडविरुद्धच्या चौथा कसोटी सामना जिंकायचा असेल तर टीम इंडियाकडून विकेट कोण घेणार? असा प्रश्न क्रीडा प्रेमींना पडला आहे. इंग्लंडच्या संघाला शार्दूल ठाकूरनं पहिला दणका दिल्यानंतर मलानने आपल्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारुन घेतली. 5 धावां करुन तो रन आउट झाला. चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला बसवून रविंद्र जाडेजावर विश्वास टाकण्यात आला आहे. त्याचीही चर्चा जोरदार रंगताना दिसते. प्रमोशन मिळाल्यानंतरही जाडेजाला बॅटिंगमध्ये फार काही कमाल दाखवता आली नाही.

आता त्याच्यावर गोलंदाजीची जबाबदारी आहे. अश्विनची जागा घेतल्यानंतर तो त्याची उणीव भरुन काढणार का? हे मॅच संपल्यावरच कळेल. मात्र त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फिल्डिंगची सजावट चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीदने कॅच सोडल्याचेही पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यानंतर जाडेजानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवत भारतीय संघाची डोकेदुखी बऱ्यापैकी कमी केली.

सामना रंगतदार स्थितीत असताना सोशल मीडियावर जाडेजासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्विनला ड्रॉप करुन विराट कोहली आता जड्डूनं सर्व विकेट घ्याव्या अशी अपेक्षा बाळगतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहीजण जाडेजाच्या गोलंदाजीचे कौतुकही करत आहेत. एकाने तर अश्विनच्या मुद्यावरुन विनाकारण जाडेजाला ट्रोल केले जात असल्याचे म्हटले आहे.

रविंद्र जाडेजाने 25 पैकी 8 निर्धाव षटके टाकताना केवळ 47 धावा खर्च केल्या. यात तो एक विकेट घेण्यातही यशस्वी ठरला. त्याने घेतलेली विकेट महत्त्वपूर्ण अशी आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या जाडेजासाठी त्याचे चाहतेही बॅटिंग करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : त्यानं आयुष्य उद्धवस्त केलं, आता आम्हाला जगायचं नाही... पती-पत्नीने सेल्फी घेत संपविले जीवन; ३ वर्षांचा चिमुकला पोरका

Solapur News:'साेलापूर शहरात दररोज हव्यात ७० प्लेटलेटस् पिशव्या'; पण एकही मिळेना; रुग्णांना उपचाराअभावी राहण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार

आलं, हवा केली अन् ट्रेंडमधून आउट! Arattai App ची रॅंकिंग धाडकण कोसळली; टॉप-1 वरून डायरेक्ट 7 नंबरवर, WhatsApp ने मारली बाजी

सरकारचा डाव प्रतिडावाने मोडून टाका, मी मुंबईला जात नसतो, त्यांचे पाय मोडले का? जरांगेंचा सवाल

SCROLL FOR NEXT