Rishabh Pant esakal
क्रीडा

Rishabh Pant: धावबाद झाला तरी पंतचं होतंय कौतुक; आम्हाला तुझ्याबद्दल आदरच...

पांड्यासाठी पंतने केलेलं त्याग पाहून क्रिकेटप्रेमी भलतेच खुश

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या क्रिकेटच्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभाव झाला. पण सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे ऋषभ पंतच्या बलिदानाची. पांड्यासाठी पंतने केलेलं त्याग पाहून क्रिकेटप्रेमी भलतेच खुश झाले आहेत. अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. (IND vs ENG Rishabh Pant Sacrifices His Wicket For Hardik Pandya )

इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पंड्याने मोलाचे योगदान दिले. त्याने 33 चेंडूत 63 धावांची खेळी साकारत भारताला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 168 धावांपर्यंत पोहोचवले. तर ऋषभ पंत स्वस्तात परतला. पंतने केवळ ६ केल्या अन् तो धावबाद झाला. मात्र, सोशल मीडियावर त्याने केलेल्या कामगिरीचे क्रिकेटप्रेमी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

पांड्यासाठी धावबाद झाला पंत

गेल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या पंतला या सामन्यात संघातून वगळले जाईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याला रोहितने साथ दिली आणि संघात त्याचा समावेश केला. शेवटच्या दोन षटकांत पंतला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याच्याकडून काही मोठे फटके अपेक्षित होते. पण पंत 6 धावा करून बाद झाला.

१९व्या षटकाचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी क्रीजवर उपस्थित होता. त्यानंतर ख्रिस जॉर्डनने एक उत्तम यॉर्कर टाकला आणि पंतला त्याच्यासोबत फलंदाजीही करता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या टोकाला उभा असलेला हार्दिक पंड्या धाव घेण्यासाठी धावला आणि जोस बटलरने जॉर्डनच्या दिशेने चेंडू फेकला आणि पंतला धावबाद केले.

पंत हार्दिक पांड्यासाठी धावबाद झाला असल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने त्यावेळी शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले होते आणि तो पूर्ण टचमध्येही दिसत होता. अशा स्थितीत हार्दिकला क्रीजवर पोहोचणे आवश्यक होते. त्यामुले पंतने त्याग केला.

पंतची ही भूमिका पाहता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. आम्हाला तुझ्याबद्दल आदरच आहे. आणि तो आणखी वाढला. तसेच, निस्वार्थी पंत. अशा शब्दात क्रिकेटप्रेमी पंतचे कौतुक करत आहेत.

T20 वर्ल्डकप 2022 च्या सेमिफायनल सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव पत्कारावा लागला आहे. यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लडच्या संघाने 16 षटकांत सहज गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT