IND vs ENG Stuart Broad On Virat Kohli news in marathi  sakal
क्रीडा

Ind vs Eng : 'ही लाजिरवाणी गोष्ट...' इंग्लंडच्या माजी दिग्गजाने विराट कोहली न खेळण्यावर केलं मोठं वक्तव्य

IND vs ENG Stuart Broad On Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये विराट कोहली संघाचा सहभागी नाही....

Kiran Mahanavar

IND vs ENG Stuart Broad On Virat Kohli : इंग्लंड सध्या भारत दौऱ्यावर आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्याचा पहिला कसोटी सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला होता आणि दुसरा कसोटी सामना भारताने विशाखापट्टणम येथे 106 धावांनी जिंकला होता.

आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून गुजरातमधील राजकोट येथे खेळला जाणार आहे. मात्र यादरम्यान वैयक्तिक कारणांमुळे किंग कोहली या मालिकेतील उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. यावर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळत नाहीये. त्यानंतर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, विराट कोहलीची मालिकेत अनुपस्थिती भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी लाजिरवाणी बाब आहे. विराट हा महान खेळाडू आहे. मैदानावरील त्याचा उत्साह इतर खेळाडूंना प्रेरणा देतो.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला पराभूत करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचाही त्याच्या बॅजबॉल शैलीत राजकोट कसोटी जिंकून मालिकेत 1-2 अशी आघाडी घेण्याकडे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT