kohli anushka sharma attend Krishna Das Kirtan In London Viral SAKAL
क्रीडा

IND vs ENG: खराब फॉर्म दरम्यान विराट पत्नी अनुष्कासोबत 'राम'च्या दरबारात

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये कृष्णा दास कीर्तनात उपस्थित होते फोटो व्हायरल

Kiran Mahanavar

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा काळ खूप वाईट जात आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता आपली विकेट वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. खराब फॉर्ममुळे त्याच्या जागी युवा खेळाडूला भारतीय संघात संधी द्यायला हवी, असे कपिल देव यांच्यासह अनेकांचे मत आहे.

सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये विराट पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. त्याला 5 डावात एकदाही 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते पत्नी अनुष्का शर्मासोबत भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेला होता.(virat kohli anushka sharma attend Krishna Das Kirtan In London Viral Photos)

अमेरिकन गायक कृष्ण दास यांनी लंडनमध्ये भजन-कीर्तनाचे आयोजन केले होते. यादरम्यान कोहली आणि अनुष्काही तेथे पोहोचले. हनुमान दास यांनी सोशल मीडिया विराट कोहली-अनुष्का शर्मा सोबत एक फोटो शेअर केला आहे. हनुदास दास यांनी सांगितले की, दोघेही कार्यक्रमाला आले होते. भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलै रोजी होणार्‍या संपणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajura Constituency: राहुल गांधींचा आरोप, पण 'राजुरा'मध्ये 'त्या' लोकांची नोंद झालीच नाही; निवडणूक आयोगाचा दावा

IND vs OMN : ओह shit..! शुभमन गिलचा ऑफ स्टम्प ओमानच्या गोलंदाजांने उखडून टाकला; संजू सॅमसनही गांगरला, Video

Mumbai News : अनिल अंबानी, राणा कपूर विरोधात सीबीआयचे आरोपपत्र सादर

Barshi Crime : अल्पवयीन मुलीला विवाहासाठी बंदुकीची धमकी; दोन मुलांसह आई-वडिलांवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates: कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT