क्रीडा

IND vs NED : दिवाळी धमाका! अपराजित टीम इंडियाने बंगळुरुतही फोडले विजयाचे फटाके! नेदरलँड्सला दाखवलं आस्मान

Kiran Mahanavar

India beat Netherlands by 160 runs : अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी बंगळुरुतही विजयाचे फटाके फोडले आहे. वर्ल्ड कप-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. आणि टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 9वा विजय नोंदवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या.

प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ केवळ 250 धावा करू शकला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट घेतल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मानेही प्रत्येकी एक विकेट घेतली. वर्ल्ड कपमधील त्याची ही पहिली विकेट आहे.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 10 षटकांमध्ये रोहित आणि शुभमन गिल यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वादळ आणले. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या. दरम्यान, गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. 3 चौकार आणि 4 षटकार मारले. रोहितने 54 चेंडूत 61 धावा केल्या. 8 चौकार आणि 2 षटकार मारले. यासह रोहितने चालू वर्ल्ड कपमध्ये 500 धावा पूर्ण केल्या आहेत. वर्ल्ड कप हंगामात 500 धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने मैदानात येताच चांगले शॉट मारले. मात्र 56 चेंडूत 51 धावा करून तो बाद झाला. त्यादरम्यान त्याने 5 चौकार आणि एक षटकार मारला. तिसरी विकेट 200 धावांवर पडली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने 200 हून अधिक धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाची धावसंख्या 400 धावांच्या पुढे नेली. अय्यर 94 चेंडूत 128 धावा करून नाबाद राहिला. त्याने 10 चौकार आणि 5 षटकार मारले. तर केएल राहुल 64 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले.

वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या मधल्या फळीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण श्रेयस अय्यरपासून ते केएल राहुलपर्यंत त्याने आपल्या कामगिरीने सगळ्यांना गप्प केले आहे. अय्यरने आतापर्यंत 4 अर्धशतके केली आहेत तर राहुलने 2 अर्धशतके केली आहेत. राहुलने यष्टिरक्षक म्हणूनही छाप सोडली आहे. 16 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होतील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT