ind vs nz 1st odi match playing 11  sakal
क्रीडा

Ind vs NZ: टीम इंडियाच्या Playing-11 मध्ये मोठा बदल! 'या' खेळाडूंची थाटात एन्ट्री

श्रीलंकेविरुद्धची मोहीम एकहाती फत्ते केल्यानंतर आता न्यूझीलंडचा गड जिंकण्यासाठी ....

सकाळ ऑनलाईन टीम

IND vs NZ 1st ODI Match Playing-11: श्रीलंकेविरुद्धची मोहीम एकहाती फत्ते केल्यानंतर आता न्यूझीलंडचा गड जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत असून के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.

यष्टिरक्षणाचाही जबाबदारी पार पाडत असलेला के. एल. राहुल वैयक्तिक कारणामुळे या मालिकेत खेळणार नाही. त्याचबरोबर श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशानचे स्थान निश्चित आहे. मात्र त्याला मधल्या फळीत खेळावे लागणार आहे.

बांगलादेशविरुद्ध विक्रमी वेगवान द्विशतक केल्यानंतर ईशानला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही, त्याच्याऐवजी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आले आणि त्याने ७०, २१, ११६ असे सातत्य दाखवल्यामुळे रोहित शर्मासह गिललाच सलामीसाठी प्राधान्य देण्यात येईल, अशा स्थितीत ईशानला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळावे लागेल.

निवड समितीसह संघ व्यवस्थापनाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ईशानसाठी ही सुवर्ण संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या सामन्यातून हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली होती आणि त्या ठिकाणी सूर्यकुमारला संधी देण्यात आली होती. आता राहुल संघात नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी हार्दिक पंड्या संघात येईल; तर श्रेयस अय्यरऐवजी ईशान असे बदल होतील.

श्रीलंकेचा संघ तसा कमजोर होता त्यामुळे भारताला निर्विवाद वर्चस्व मिळवणे कठीण गेले नाही. अखेरच्या सामन्यात तर एकदिवसीय सामन्यातला विक्रमी विजय मिळवला होता, परंतु केन विल्यमसन आणि टीम साऊदी खेळत नसला तरी न्यूझीलंडचा संघ चांगल्या तयारीचा आहे. पाकिस्तानमधील मालिका जिंकून ते भारतात आले आहेत, त्यामुळे भारतासाठी हे आव्हान सोपे नसेल असे सांगितले जात आहे. न्यूझीलंडकडेही ताकदीचे आक्रमक फलंदाज आहेत.

सिराज फॉर्मात

भारतासाठी महम्मद सिराजचा फॉर्म गोलंदाजीतील ताकद वाढवणारा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने कमालीची प्रभावी गोलंदाजी केली होती. त्याचा आत्मविश्वास इतर गोलंदाजांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे. अक्षर पटेलनेही वैयक्तिक कारणासाठी माघार घेतल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल पैकी एकाला संधी मिळू शकेल. वॉशिंग्टन फलंदाजीही करत असल्यामुळे त्याला प्राधान्य असेल.

कोहली फॉर्मात

रोहितवर लक्ष विराट कोहली कमालीचा फॉर्मात आहे. चार सामन्यांत तीन शतके करणारा कोहली न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही गाजवण्यास सज्ज आहे, परंतु रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने शतकाकडे कूच केली होती, पण यश आले नाही. रोहितने शतक करून आता बऱ्याच कालावधी लोटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT