IND vs NZ Sakal
क्रीडा

साहा-अय्यरच्या अर्धशतकाचा 'सहारा'; किवींसमोर तगडे लक्ष्य

सुशांत जाधव

न्यूझीलंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून अश्विनने विल यंगच्या रुपात त्यांना पहिला धक्का दिला आहे.

India vs New Zealand, 1st Test Day 4 Stumps : कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रेयस अय्यरने केलेल्या आश्वासक अर्धशतकी खेळीनंतर वृद्धिमान साहाने नाबाद अर्धशतक झळकावले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आपला दुसऱ्या डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून अश्विनने विल यंगच्या रुपात त्यांना पहिला धक्का दिला आहे.

श्रेयस अय्यरने पदार्पणात ऐतिहासिक खेळीची नोंद केली. पहिल्या डावातील शतकी खेळीनंतर त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक करुन संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा गोत्यात येईल का? असा प्रश्न होता. याच कारण तिसऱ्या दिवशी दुखापतीने त्रस्त झालेला वृद्धिमान साहा मैदानात किती काळ तग धरेल, यासंदर्भात शंका होती. पण या जखमी वाघानं दमदार खेळी करुन दाखवली. त्याने 126 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकारासह 1 षटकार खेचला.

दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलनं त्याला उत्तम साथ दिली. अक्षर पटेलने 67 चेंडूत 28 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने 2 चौकार आणि एक षटकार खेचला. साहा-अक्षर पटेल यांनी आठव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचत भारताचा दुसरा डाव 234 धावांपर्यंत पोहचवला. पहिल्या डावातील 49 धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडला 284 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अश्विने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला असून भारतीय संघाला विजयासाठी अखेरच्या दिवशी 9 विकेट घ्यायच्या आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 280 धावांची आवश्यकता आहे.

कसोटी सामन्यात धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने यापूर्वी दोन मोठे विजय नोंदवले आहेत. 1993-94 मध्ये न्यूझीलंडने घरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध 324 धावा करुन विजय मिळवला होता. 2008-09 मध्ये बांगलादेशला त्यांनी घरच्या मैदानावर 317 धावा करुन पराभूत करुन दाखवले होते. पण कानपूरच्या मैदानात 284 धावा करण कठीणच आहे. चौथ्या डावात 240 ही या मैदानातील सर्वाच्च धावसंख्या आहे. भारतीय संघानेची ही धावसंख्या केली होती. पण यावेळी वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT