cheteshwar pujara daughter aditi
cheteshwar pujara daughter aditi  Sakal
क्रीडा

पुजारा लेकीच्या आठवणीत रमला; फोटो होतोय व्हायरल

सुशांत जाधव

भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाच्या हाततोंडचा घास हिरावला होता. दोन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ बरोबरीत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू मुंबईत पोहचले असून दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कसून सराव करत आहेत.

मुंबई कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) सरावातून काही वेळ काढून कुटुंबियांसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील एक खास स्टोरी शेअर केलीये. त्याने इन्स्टावर मुलगी अदितीचा खास फोटो अपलोड केलाय. यात अदिती टीम इंडियाच्या कसोटी जर्सीत दिसत आहे. एवढेच नाही तर ती बॅट उंचावून या क्षणाचा पूरेपूर आनंद व्यक्त करताना पाहायला मिळते.

चेतेश्वर पुजाराने इन्स्टाग्रामवर जी स्टोरी शेअर केलीये त्याच कॅप्शन लक्षवेधी असेच आहे. 'चिमुकली आपल्या वडिलांप्रमाणे टीम इंडियाची जर्सी घालून सज्ज झालीये. स्कूल एक्टिव्हिटी आणि स्टार्टिंग यंग या हॅशटॅगचाही वापर पुजाराने केल्याचे दिसते. सध्याच्या घडीला पुजारा टीम इंडियासोबत आहे. पुजाराची लेक आणि त्याची पत्नी सध्या घरीच आहेत. इंग्लंडच्या दौऱ्यावर तो कुटुंबियासोबत गेला होता. एवढेच नाही तर आयपीएल 2021 च्या हंगामातही पत्नी आणि लेक पुजारा सोबत दिसली होती.

चेतेश्वर पुजारा मागील काही वर्षांपासून टीम इंडियाचा कायमचा सदस्य आहे. त्याने 154 कसोटी डावात 6,542 धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात 31 अर्धशतक आणि 18 शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. 2019 मध्ये सिडनीच्या क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. काही सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT