ind vs nz 2nd t20 match captain-hardik pandya  
क्रीडा

IND vs NZ: द्रविड अन् कॅप्टन पांड्या घेणार मोठा निर्णय! 'या' खेळाडूची T20 कारकीर्द संपणार?

पृथ्वी शॉसारख्या स्फोटक फलंदाजाला सलामीला संधी तर....

Kiran Mahanavar

India vs New Zealand 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी 7.00 वाजता लखनौ येथील एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा न्यूझीलंडविरुद्धची सध्याची तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकण्याची संधी टीम इंडियाच्या हातातून निघून जाईल.

टीम इंडियाच्या एका खेळाडूची टी-20 कारकीर्द आज संपुष्टात येऊ शकते. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान मोठा निर्णय घेऊ शकतात.

शुक्रवारी रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या पराभवात एक खेळाडू सर्वात मोठा खलनायक ठरला, जो आता भारताच्या टी-20 संघात खेळताना दिसणार नाही. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड एक मोठा निर्णय घेणार आहेत. राहुल त्रिपाठीला संघातून वगळतील. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाईल.

कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राहुल त्रिपाठीवर विश्वास ठेवला आणि पहिल्या T20 सामन्यात राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवलं, जिथे तो फ्लॉप ठरला. कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने राहुल त्रिपाठीला पहिल्या T20 सामन्यात संधी देऊन सर्वात मोठी चूक केली, ज्याची किंमत टीम इंडियाला 21 धावांनी गमवावी लागली. राहुल त्रिपाठी अचानक बाद झाल्याने सर्व दडपण मधल्या फळीवर आले. टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

दुसऱ्या टी-20 सामन्यात राहुल त्रिपाठीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येणार असून इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर हलवण्यात येणार आहे. शुभमन गिलसह पृथ्वी शॉसारख्या स्फोटक फलंदाजाला सलामीला संधी मिळेल. जर पृथ्वी शॉने सलामी दिली आणि इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावला तर राहुल त्रिपाठी टी-20 संघातून कायमचा बाहेर जाईल.

अशा स्थितीत राहुल त्रिपाठीची टी-20 कारकीर्दही संपुष्टात येणार आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. अष्टपैलू दीपक हुडा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल, जो फिनिशरसह अष्टपैलू खेळाडूचीही भूमिका बजावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT