ind vs nz 2nd t20 virat kohli tweet after suryakumar yadav 100 off 49 balls against new Zealand  
क्रीडा

IND vs NZ 2nd T20: अजून एक व्हिडिओ गेमवाली खेळी! विराटने सूर्याची खेळी पाहून केले ट्विट

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांच्या टी-२० सीरीजमधील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ६ बाद १९१ धावांचे लक्ष ठेवले आहे. यामध्ये भारताचा आक्रमक फलंदाड सूर्यकुमार यादव याच्या धडाकेबाज शतकाचा मोठा वाटा आहे. या शतकीय खेळीनंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विट करुन सूर्यकुमारचं कौतुक केलं आहे.

सूर्यकुमार यादवची टी-20 मधील उत्कृष्ट कामगिरी पुढेही चालू आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये शतक ठोकले आहे. अशा प्रकारे त्याच्या 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1100 धावा पूर्ण झाल्या आहेत. सूर्याने 49 चेंडूत हे शतक पूर्ण केले. 2022 च्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशाप्रकारे त्याने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी देखील केली. सूर्या 51 चेंडूत 111 धावा करून नाबाद राहिला. 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले.

"न्यूमेरो यूनो दाखवत आहे की तो जगातील सर्वोत्तम का आहे. त्याला लाइव्ह पाहिले नाही. पण मला खात्री आहे की, ही त्याची आणखी एक व्हिडिओ गेम इनिंग होती." असे ट्विट विराट कोहलीने केले आहे.

सूर्यकुमार यादवने यापूर्वी 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर 117 धावांची शानदार खेळी केली होती. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेईल आणि मालिका गमावण्याचा धोकाही टळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT