टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा ओपनिंगमध्ये फ्लॉप ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला ईशान किशनसोबत सलामीला पाठवण्यात आले होते, मात्र तो 13 चेंडूत केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनकडे टिम सौदीच्या हातून झेलबाद झाला. (IND vs NZ 2nd T20I Rishabh Pant flopped in opening Catch Out)
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना न्यूझीलंडच्या माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 6.4 षटकात 1 गडी गमावून 50 धावा केल्या, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव नाबाद आहेत.
ऋषभ पंत ठरला फ्लॉप
तिसऱ्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर स्लीप हटवली अन् इशानने हिच संधी साधताना लेट कट मारून चौकार मिळवला. ॲडम मिलनेने दुसऱ्या षटकात ८ धावा दिल्या आणि यात ७ अतिरिक्त धावा होत्या. लॉकी फर्ग्युसनचे स्वागत इशानने षटकाराने केले.
पावसाचीही रिपरिप सुरू होती. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात ऋषभने ( ६) फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. टीम साऊदीने अप्रतिम रिटर्न कॅच घेताना भारताला ३६ धावांवर पहिला धक्का दिला.
त्याच्या या फ्लॉप खेळीमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ माउंट माउंगानुई येथे दुसरा टी-२० सामना खेळत आहे. या सामन्यासाठी संजू सॅमसनला डावलून पंतला संधी दिली. मात्र, पंत केवळ ६ धावांवर बाद झाला. त्याच्या या खराब कामिगीमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.