India vs New Zealand Semi-Final World Cup 2023 
क्रीडा

IND vs NZ Semi-Final: सेमीफायनल पावसाने वाहून गेल्यास काय? जाणून घ्या कोणत्या संघाला होणार फायदा अन्...

Kiran Mahanavar

India vs New Zealand Semi-Final World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये लीग टप्प्यातील सर्व आता सर्व सामने खेळल्या गेले आहेत. सहा संघ आपल्या बॅगा भरून मायदेशी परतले असून चार संघ वर्ल्ड कप ट्रॉफीचे स्वप्न घेऊन मुंबई आणि कोलकात्यात तळ ठोकून आहेत. भारतीय संघ मुंबईत गेला आहे. त्याला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. येथे त्यांना न्यूझीलंडचे आव्हान असेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात पावसाचा धोका नसला तरी सध्या भारताच्या काही भागात ढगाळ वातावरण असून सर्वत्र पाऊस पडत आहे.

म्हणजेच पावसाची काहीशी शक्यता कायम आहे. अशा परिस्थितीत भारताच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही पाऊस अडथळा आला तर काय होईल? संपूर्ण सामना पावसात वाहून गेला तर?

ICC ने वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच या सामन्यांदरम्यान पाऊस पडल्यास दुसऱ्या दिवशीचा खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. षटके कोणत्याही प्रकारे कमी केली जाणार नाहीत.

राखीव दिवशीही पाऊस पडला आणि डकवर्थ-लुईस पद्धतीने दुसऱ्या डावात आवश्यक तेवढी षटके खेळली गेली, तर विजय किंवा पराभवाचा निर्णय होईल. पण दुसऱ्या डावात आवश्यक षटके टाकता आली नाहीत, तर गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे विजेता घोषित केला जाईल.

भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस पद्धतीचा अवलंब करून षटके टाकता आली नाहीत, तर टीम इंडियाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, असा निष्कर्ष निघतो. कारण गुणतालिकेत भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे.

भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. बरं, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातही निकाल असाच लागेल. म्हणजेच दुसरा उपांत्य सामना पावसाने वाहून गेला तर दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT