Rohit Sharma 
क्रीडा

IND vs NZ Semi-Final: वानखेडेवर रोहितची खेळी, ट्रेंड अन् वडापाव विक्रेत्याची चांदी; काय आहे प्रकार जाणून घ्या

रोहितच्या खेळीमुळं वडापाव होता सोशल मीडियात होत होता ट्रेंड

Chinmay Jagtap

IND vs NZ Semi-Final: क्रिकेट वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलचा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना वानखेडे स्टेडिअमवर सुरु आहे. क्रिकेट चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

विशेष म्हणजे या स्टेडिअमबाहेर चर्चगेट स्टेशनजवळ वडापाव विकणाऱ्या एका विक्रेत्याचा धंदा चांगलाच तेजीत आला. एकीकडं भारताचा सामना अन् दुसरीकडं या वडापाव विक्रेतीची अक्षरशः चांदी झाली. (IND vs NZ Semi Final Rohit Sharma innings at Wankhede Vadapav trend and Sale of Vada Pav)

वडापाव विक्रेत्याची चांदी

राम प्रसाद असं या वडापाव विक्रेत्याचं नाव असून गेल्या पंधरा वर्षांपासून तो चर्चगेट स्टेशनबाहेर वडापाव विक्रीचं काम करतात. दररोज त्यांच्या गाडीवर सरासरी 100-150 वडापाव विकले जातात. मात्र, आज वर्ल्डकप सेमीफायनल असल्यानं त्यांच्या दुकानावर क्रिकेटच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केल्याचं पहायला मिळालं. (Latest Marathi News)

आज दिवसभरात या विक्रेत्यानं 500 हून अधिक वडापाव विकले. वडापावसोबतच ते ब्रेड बटर, जाम ब्रेड आणि समोसा पावही विकतात. आज त्यांनी वडापाव इतकेच चहा देखील विकले, इतर वेळेच्या तुलनेत आज झालेला व्यवसाय हा तब्बल तीन ते चार पट असल्याचं त्यांनी सांगितलं.

वडापाव सोशल मीडियात ट्रेंड

आजच्या भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान दुपारी वडापाव ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये होता. त्याचं कारणही भन्नाट आहे. ज्यावेळी हा ट्रेडं सुरु होता त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा तुफान खेळत होता. त्याचं कारण म्हणजे रोहित शर्माला वडापाव असं संबोधलं जातं. कारण त्याला वडापाव प्रचंड आवडतो आणि तो मुंबईचा रहिवासी असल्यानं त्याला असं संबोधनं सहाजिकचं आहे. (Marathi Tajya Batmya)

विशेष म्हणजे समालोचक हर्षा भोगले यांनी देखील रोहितची खेळी पाहून मजेशीर टिप्पणी करताना 'होल्ड माय वडापाव' असं ट्विट केलं होतं. त्यामुळं रोहितची ओळख वडापाव ही अधिकचं रुढ झाल्याचं दिसून येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT