क्रीडा

IND vs NZ Semi Final : सेमीफायनल कोण जिंकणार? मॅच बघायला आलेल्या बेकहॅमने केली भविष्यवाणी

संतोष कानडे

IND vs NZ Semi Final Mumbai Wankhede Stadium : भारत आणि न्युझीलंडच्या सामन्याची चुरस कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युझीलंडच्या गोलदाजांना सळो की पळो करुन सोडले. बुधवारी सेमीफायनलमध्ये कोण जिंकणार, याबद्दल इंग्लंडचा माजी फुटबॉल कर्णधार डेव्हिड बेकहॅम याने भविष्यवाणी केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून पहिला उपांत्य सामना बुधवारी खेळला जात आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मॅच बघण्यासाठी आलेला इंग्लंडचा माजी फुटबॉल कर्णधार डेव्हिड बेकहॅम याने भारत जिंकणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, "न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारत आज जिंकेल, असे मला वाटते. त्यानंतर पुढच्या सामन्यात काय होईल ते आपण पाहू. जर भारताचा विजय झाला तर फायनल मॅच बघणं औत्सुक्याचं असेल. आजच्या मॅचसंदर्भात मी मुंबईतला माहोल अनुभवत आहे."

सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक पूर्ण करताच सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केली. विराट कोहलीने सचिन तेंडलुकरचे 49 वनडे शतकांचा विश्वविक्रम देखील मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: सिसारखेडा येथे गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT