MS Dhoni gone responsibility is on me Hardik Pandya sakal
क्रीडा

Hardik Pandya: धोनी नाही आहे त्यामुळे जबाबदारी माझी; हार्दिक म्हणाला 'आता मीच...'

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील विजयानंतर हार्दिक पांड्याने मोठी धक्कादायक प्रतिक्रिया

Kiran Mahanavar

Hardik Pandya IND vs NZ T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. जिथे शुबमन गिलने पहिले T20 शतक झळकावल्यानंतर गोलंदाजांच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीने भारताने हा सामना 168 धावांनी जिंकला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. भारताचा 168 धावांनी विजय हा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठा विजय आणि न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी धोनी, विराट कोहली किंवा रोहित यांच्या नेतृत्वाखाली टी-20 मध्ये एवढा मोठा विजय मिळवता आला नव्हता.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील विजयानंतर हार्दिक पांड्याने मोठी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतल्यापासून तो खूप सावधपणे खेळू लागला आहे, असे त्याने म्हटले आहे. पांड्याच्या म्हणण्यानुसार, धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्यावर बरीच जबाबदारी आली आहे आणि तो ती जागा भरण्याचा प्रयत्न करत आहे.

हार्दिक पांड्याने स्ट्राईक रोटेट करण्यावर अधिक भर दिला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला षटकार मारण्यात नेहमीच मजा येते पण तेच आयुष्य आहे. आता मला हुशारीने खेळावे लागेल. माझा भागीदारीवर विश्वास आहे. मी या खेळाडूंपेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि त्यामुळेच दडपणाखाली कसे खेळायचे आणि शांत कसे राहायचे हे मला माहीत आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला की, कदाचित यासाठी मला माझा स्ट्राइक रेट कमी करावा लागेल. नवीन भूमिका साकारण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. जेव्हा माही भाई खेळत होते, तेव्हा मी लहान होतो आणि सर्वत्र शॉट्स मारत होतो. मात्र निवृत्तीनंतर अचानक सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्याचा परिणाम आम्हाला मिळत आहे आणि त्यासाठी जर संथ खेळायचा असेल तर त्यात काहीच हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT