IND VS PAK Cricket Match 
क्रीडा

IND VS PAK : भारत-पाक सामन्याचीच सर्वत्र चर्चा

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना या लढतीचे महत्त्व नेहमीच वेगळे असते

सुनंदन लेले

दुबई : इतर कोणतेही क्रिकेट सामने आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना या लढतीचे महत्त्व नेहमीच वेगळे असते. खेळाडूंना त्याचे दडपण असते तसेच संयोजक आणि पाठीराख्यांनाही असते. या दोघांमधील लढती फक्त आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कप या प्रकारात होतात. साहजिकच त्याची लज्जत अजून वाढते म्हणूनच संयोजकांना हमखास आर्थिक फायदा होतो. टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क चढ्या भावाने विकले जातात आणि सामन्याची तिकिटे हातोहात संपतात. हेच सर्व लक्षात घेऊन संयोजकांनी स्पर्धेची मांडणी या दोघांमध्ये किमान दोन लढती होतील आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले तर तिसरी लढत होईल अशी केली आहे.

येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाक संघांना मुद्दाम एका गटात ठेवले गेले आहे, जिथे त्यांच्यात पहिली लढत २७ तारखेला होईल. ३ संघांच्या दोन गटांतून प्रत्येकी दोन संघ पुढील फेरीत जातील जिथे ते चार संघ आपापसात परत खेळतील. म्हणजे तिथे भारत पाकिस्तान दुसरी लढत ४ सप्टेंबरला होण्याची शक्यता निर्माण केली गेली आहे आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे सगळे झाले तर हेच २ संघ ११ सप्टेंबरला अंतिम सामन्यात भिडतील. थोडक्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका भारत वि. पाकिस्तानदरम्यान होईल अशी मांडणी केली गेली आहे.

आशिया कप स्पर्धा भारत-पाकिस्तान संघांकरिता मनाची आहे. त्यातून मुख्य टी-२० वर्ल्ड कप जवळ येऊन ठेपला आहे. बुधवारी पाकिस्तान संघाने दुपारी ४ ते ६ च्या ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उन्हात सराव केला. भारतीय संघाने किंचित ऊन सरल्यावर (३९ अंश सेल्सिअस) संध्याकाळी ६ ते ८ आयसीसीच्या सराव सुविधेत मेहनत केली. सरावासाठी जाता-येता भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांशी मजेत बोलत होते. मैदानावर खुन्नस असली तरी बाहेर संबंध चांगले दिसले. खास करून विराट कोहली आणि पाकिस्तानचा कप्तान बाबर आझम खूप आपुलकीने एकमेकांना भेटले तो क्षण छायाचित्रकारांसाठी पर्वणीचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Stock Market Today : शेअर बाजार ‘लाल’ रंगात बंद; सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला, Reliance ला मोठा झटका; पण ‘हे’ शेअर्स तेजीत

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Thane Metro: ठाणे मेट्रो कधी सुरू होणार? प्रताप सरनाईकांनी 'ती' वेळच सांगितली! तारखेबाबत मोठी अपडेट समोर

OTTवर अचानक ट्रेंड होतोय २ वर्ष जुना सिनेमा; IMDb रेटिंग फक्त ५. ८; पण पाहणाऱ्यांची झालीये गर्दी

SCROLL FOR NEXT