Emerging Asia Cup  Rajvardhan Hangargekar
Emerging Asia Cup Rajvardhan Hangargekar 
क्रीडा

Ind vs Pak : 'महाराष्ट्र एक्स्प्रेस'च्या तुफानी गोलंदाजीने हादरला पाकिस्तान! थेट अर्ध्या संघाने टेकले गुडघे

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Pak Emerging Asia Cup Rajvardhan Hangargekar : एकीकडे भारतीय वरिष्ठ संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी तयारी करत आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेत इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये भारताचा अंडर-23 संघ पाकिस्तानशी लढत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाकिस्तान संघाने फलंदाजीसाठी अनुकूल वाटणाऱ्या खेळपट्टीवर जोरदार सुरुवात करण्याचे नियोजन केले होते, मात्र तसे झाले नाही. पाकिस्तान संघाने 48 षटकात 205 धावा केल्या. अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या राज्यवर्धन हंगरगेकरने चपळ गोलंदाजी करत 5 फलंदाजांना बाद केले.

आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करणाऱ्या हंगरगेकरने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने चौथ्या षटकात दोन पाकिस्तानी फलंदाजांची शिकार केली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर सॅम अयुब यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडे झेलबाद झाला. अयुबला 11 चेंडूंचा सामना करूनही खाते उघडता आले नाही. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर ओमर युसूफला खाते उघडण्यापूर्वीच त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या राज्यवर्धन हंगरगेकरला महाराष्ट्र एक्सप्रेस असेही म्हणतात. उस्मानाबादमध्ये जन्मलेला हा अष्टपैलू वेगवान गोलंदाजाला आयपीएल लिलावादरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये जोरदार बोली लावली होती. त्याची गोलंदाजीही जसप्रीत बुमराहसारखीच आहे. या खेळाडूची मूळ किंमत 30 लाख होती पण अखेर धोनीच्या संघाने त्याला 1.50 कोटी रुपयांना खरेदी केले. या मोसमात हंगरगेकरने 2 सामन्यात 3 बळी घेतले. संधी मिळाल्यास तो पुढील मोसमात आणखी आश्चर्यकारक कामगिरी करेल.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा डाव 48 षटकांत संपवला. पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. पाकिस्तानकडून कासिम अक्रमने सर्वाधिक 48 धावा केल्या. शाहिबजादाने 35 धावांचे योगदान दिले. शेवटी मुबासिरने 28 आणि मेहरानने 25 धावा केल्या. भारताकडून हंगरगेकरच्या पाच बळींव्यतिरिक्त मानव सुथेरने तीन बळी घेतले. रियान पराग आणि निशांत सिंधूला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT