ind vs pak t20 wc Relax padosiyon TV ka kya kasoor sakal
क्रीडा

VIDEO: 'आम्ही इथे फटाके फोडतोय अन् तुम्ही TV...' सेहवागचा पाकिस्तानला टोला....

एकीकडे भारतात जल्लोषाचे वातावरण असतानाच दुसरीकडे पाकिस्तान देशात शोककळा पसरली आहे

Kiran Mahanavar

Ind vs Pak T20WC Virender Sehwag : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे विराट कोहलीची शानदार खेळी. मेलबर्न क्रिकेट मैदानावर विराटने 56 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 82 धावांची नाबाद खेळी खेळली. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2021 च्या शेवटच्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. छोटी दिवाळीला मोठा धमाका करत विराटने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारताने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाने एकीकडे भारतात जल्लोषाचे वातावरण असतानाच दुसरीकडे पाकिस्तान देशात शोककळा पसरली आहे. भारतात जिथे लोक विजयाचा आनंद साजरा करत फटाके फोडत आहेत, तिथे पाकिस्तानात लोक टीव्हीवर राग काढत आहेत. सेहवागने सोशल मीडियावर पाकिस्तानींची खिल्ली उडवली आहे.

वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर एक चाहता टीव्ही तोडताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत सेहवागने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, शेजारी आराम करा! तो फक्त एक खेळ आहे. आमच्या इथे दिवाळी आहे, तुम्ही फटाके फोडता आणि तुम्ही विनाकारण टीव्ही फोडता. नाही यार, यात टीव्हीचा काय दोष?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर पांड्या आणि विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी 78 चेंडूत 113 धावांची शतकी भागीदारी करत भारताला मिळवून दिला. हार्दिकने 37 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandipura Virus : गुजरातमध्ये २२ मुलांचा मृत्यू , आधी ताप अन् मग बेशुद्ध... चंडीपुरा व्हायरसची काय आहेत लक्षणे?

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

Maharashtra Politics: ‘गूँगी गुडिया’ वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने; गांधी भवनात घोषणाबाजी, सुनेत्रा पवारांवरील पोस्टने पेटला वाद

Maharashtra IMA Strike: सीसीएमपी होमिओपॅथांना अलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी; नोंदणीविरोधात ११ हजार डॉक्टरांचा बेमुदत संप सुरूच

सोलापूर जिल्हा परिषदेचा नियम म्हणजे नियम! वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ५ जणांना कुत्रा चावला तरच मिळेल लस; सदस्यांचा संताप, वाचा...

SCROLL FOR NEXT