IND vs PAK Wasim Akram Says Hardik Pandya is Currently Best All Rounder In The World esakal
क्रीडा

Hardik Pandya : अक्रम म्हणतो, माझ्या दृष्टीने 'हा' आहे जगातील सर्वात उत्कृष्ट अष्टपैलू

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये भारत आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडला. भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधील पराभवाची परतफेड केली. भारताने पाकिस्तानला 147 धावात रोखले होते. मात्र हे टार्गेट पूर्ण करताना देखील भारताची दमछाक झाली. अखेर हार्दिक पांड्याने 17 चेंडूत केलेल्या नाबाद 33 धावांच्या खेळीमुळे भारताने सामना 19.4 षटकात जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत विजयासाठी 6 धावांची गरज असताना षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने गोलंदाजीतही प्रभावी मारा करत 3 विकेट घेतल्या. पांड्याच्या याच अष्टपैलू कामगिरीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम जाम खूष झाला आहे. (Wasim Akram Says Hardik Pandya is Currently Best All Rounder In The World)

पाकिस्तानचा हा माजी कर्णधार हार्दिक पांड्याच्या कौतुकाचे पूल बांधताना म्हणाला की, 'त्याला महिती आहे की तो सध्याच्या घडीचा जगभरातील सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तो 140 Kmph च्या वेगाने गोलंदाजी करतोय. ज्यावेळी फलंदाजीचा वेळ येते त्यावेळी तो सामन्यातील परिस्थितीनुसार आपल्या खेळी सजवतो. यामुळेच तो भारताचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे.'

दरम्यान, या चर्चेवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने देखील मान्य केले की तो सध्याच्या घडीचा भारताचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. हार्दिक पांड्या भारताचा खऱ्या अर्थाने एक्स फॅक्टर आहे. पठाण म्हणाला की, चार वर्षापूर्वी याच स्टेडियमवर हार्दिकला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे स्ट्रेचवरवरून मैदान सोडावे लागले होते. याच मैदानावर चार वर्षांनी पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकणे हे सर्वात मोठे यश आहे.

हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर फलंदाजीत त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा करत भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. चार वर्षापूर्वीच हार्दिक पांड्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला संघातून जवळपास तीन वर्षे बाहेर रहावे लागले होते.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत हार्दिक पांड्या म्हणाला, 'या विजयामुळे मी खूप खूष आहे कारण हा विजय आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. एक संघ म्हणून आमच्यासमोर मोठे आव्हान होते. ज्या प्रकारे रविंद्र जडेजाने चांगली फलंदाजी केली ते पाहून मी खूप खूष झालो. तो सुरूवातीला स्वतःचा वेळ घेतो आणि त्यानंतर तो ज्यासाठी प्रसिद्ध आहे तेच करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : आईसह दोन लेकींचे मृतदेह सापडले; रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेला दुःखद पूर्णविराम

Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT