क्रीडा

IND vs SA : पहिला टी-20 रद्द झाल्याने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी! World Cup साठी फक्त 5 सामने बाकी...

Kiran Mahanavar

India vs South Africa Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डर्बनमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिला टी-20 रद्द झाल्याने भारतासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण आता भारतीय संघाचे 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी फक्त 5 टी-20 सामने शिल्लक आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आधी टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये जाण्यासाठी एकूण 6 टी-20 सामने होते, त्यापैकी एक रद्द झाला आहे.

आफ्रिका दौऱ्यानंतर, टीम इंडिया जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. जी 2024 टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची मालिका असणार आहे. वर्ल्ड कपपूर्वी टी-20 फॉरमॅटमध्ये कमी सामने खेळणे टीम इंडियासाठी कठीण होऊ शकते.

अलीकडेच, भारतीय संघ 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत टी-20 वर्ल्ड कप जिंकायचा आहे.

टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, त्यासाठी तयारी सर्वात महत्त्वाची असेल. अशा स्थितीत टीम इंडियाचे पुढील पाच सामने महत्वाचे असतील. मात्र, वर्ल्ड कपपुर्वी आयपीएल 2024 खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळतील. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाणारी आयपीएल भारतीय खेळाडूंसाठीही फायदेशीर ठरू शकते.

टीम इंडिया 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाली होती. यावेळी, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणार्‍या 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला कोणतीही चूक करायची नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT