Ind Vs SA  sakal
क्रीडा

Ind Vs SA 3rd T20: एका बॉलमध्ये दोन खेळाडू आऊट तरीसुद्धा पडली नाही विकेट

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने स्वतःच्या पायाने स्टंप उडवले, पण त्यानंतरही तो नाबाद राहिला

Kiran Mahanavar

Ind Vs SA 3rd T20 : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-20 मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, मात्र मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण दक्षिण आफ्रिकेने 227 धावांची मोठी धावसंख्या उभारून रोहितचा निर्णय चुकीचा ठरला. टीम इंडियाचा 49 धावांनी पराभव झाला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आणि भारताचे क्षेत्ररक्षणही अत्यंत खराब झाले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. पण असा प्रसंग आला की प्रत्येक चाहत्याला आश्चर्य वाटले. कारण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने स्वतःच्या पायाने स्टंप उडवले, पण त्यानंतरही तो नाबाद राहिला. एकाच चेंडूवर दोन फलंदाज दोनदा बाद झाले, त्यानंतरही आफ्रिकेची विकेट पडली नाही.

भारतासाठी मोहम्मद सिराजने डावातील 17 वे षटक टाकले. संपूर्ण षटकात मोहम्मद सिराजने 8 धावा दिल्या, मात्र या संपूर्ण षटकात नाट्य राहिले. मोहम्मद सिराजने 17व्या षटकातील पाचव्या चेंडूवर नो बॉल टाकला, जो उमेश यादवने बाऊंड्रीवर झेल घेतला. मोहम्मद सिराज पुढीचा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हाच रिले रोसोने स्वतःचे स्टंप उडवले.

रॉसो फ्री-हिटचा फायदा घेण्यासाठी क्रीजच्या खूप मागे गेला होता, त्यादरम्यान त्याचा पाय स्टंपला लागला. पण तो फ्री-हिट होता आणि चेंडूही टाकला नव्हता त्यामुळे तो नाबाद राहिला. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एकाच चेंडूवर दोनदा बाद झाले आणि दोन्ही वेळा नाबाद राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT