INDvSA esakal
क्रीडा

IND v SA: निर्णायक सामन्यात पावसाचे विघ्न?

अखेरची लढत : आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची भारताला अधिक संधी

सकाळ डिजिटल टीम

सलग दोन विजय मिळवून मालिका गमावण्याचे संकट टाळणाऱ्या भारतीय संघाला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी -२० मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे. काही कमकुवत बाजूंचा अपवाद वगळता भारतीय संघाचे पारडे जड आहे, परंतु सामन्याचे भवितव्य पावसावर अवलंबून असणार आहे.

आठ दिवसांत चार सामने खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतरही तोच संघ कायम ठेवला. आता उद्याच्या निर्णायक सामन्यातही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. आयपीएल गाजवणारा दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून ठसा उमटवत आहे; तर आवेश खान आणि हर्षल पटेल वेगवान गोलंदाजीतील भेदकता दाखवत असताना युझवेंद्र चहल फिरकीची जादू सादर करत आहे, त्यामुळे भारताला सलग दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधता आली आहे.

पहिले दोन सामने जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ जोमात आला होता, परंतु शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात झालेला मोठा पराभव त्यातच कर्णधार बावूमाला झालेली दुखापत दक्षिण आफ्रिकेची गाडी रुळावरून घसरण्याच्या स्थितीत आहे.

फॉर्म हरपलेल्या पंतच्या नेतृत्वाबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. रोहित शर्मा, के.एल. राहुलच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले होते. आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, (पंत आता इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणार आहे) परंतु येथून पुढे पंतकडे अपवादात्मक परिस्थितीही कर्णधारपद देताना निवड समिती सावध असेल.

श्रेयस अय्यरकडूनही अपेक्षा

मधल्या फळीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव नसल्यामुळे जबाबदारी आलेला श्रेयस अय्यरही अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. उद्याच्या निर्णायक सामन्यात त्यालाही धावा कराव्या लागतील. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक असे फलंदाज असल्यामुळे श्रेयसवरचे दडपण कमी झाले आहे, परंतु त्याला आपले योदगान द्यावेच लागणार आहे.

वेगवान गोलंदाजांना मिळालेला सूर भारतीयांसाठी जमेची बाजू आहे, पहिल्या दोन सामन्यांत भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता इतरांकडून निराशा झाली होती, आता आवेश खान आणि हर्षल पटेलसुद्धा मॅचविनिंग कामगिरी करत आहेत. फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहलला योग्य साथ अक्षर पटेलकडून अपेक्षित आहे.

पावसाचा व्यत्यय अपेक्षित

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या सायंकाळी वादळी पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे कमी षटकांचाही सामना होऊ शकतो. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर अद्ययावत पद्धतीची ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस थांबला तर लगेचच खेळ सुरू होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT