IND vs SA After captain Rishabh Pant danger of being out of the team Wasim Jaffer  
क्रीडा

पंतचे संघातील स्थान धोक्यात; वासीम जाफरचे मत

माजी क्रिकेटपटू वासीम जाफरचे मत; राहुल, कार्तिकचे पर्याय उपलब्ध!

Kiran Mahanavar

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी के. एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे कर्णधार होण्याची सुवर्णसंधी मिळालेल्या रिषभ पंतची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत आहे. त्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० सामन्यांत तितकीशी खास कामगिरी केलेली नाही. भारत सध्या या मालिकेत २-२ अशा बरोबरीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू वासीम जाफर याने, पंत अशीच कामगिरी करत राहिल्यास त्याचे टी-२० संघातील स्थानही धोक्यात असल्याचे म्हटले आहे.(IND vs SA After captain Rishabh Pant danger of being out of the team Wasim Jaffer)

‘‘रिषभ पंत हा निडर खेळाडू असून अवघ्या काही षटकांत सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे, पण त्याची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत आहे. विशेषत: टी-२० मध्ये तो त्याच्या नावानुसार आणि स्थितीनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे,’’ असे जाफरने यावेळी म्हटले आहे. जाफर पुढे म्हणाला, ‘‘दुखापतीतून परतल्यावर टी-२० संघात के. एल. राहुलचे स्थान निश्चित आहे. तो यष्टीरक्षक म्हणूनही काम करतो. तसेच दिनेश कार्तिकही त्याच्या आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे संघात वरच्या क्रमांकावर खेळण्यास उत्सुक आहे, त्यात तो चांगला यष्टीरक्षकही आहे. त्यामुळे पंतचा अलीकडचा फॉर्म पाहता, टी-२० संघात त्याचे स्थान निश्चित झाले आहे, असे मला तरी वाटत नाही.’’

द. आफ्रिकेविरुद्धही निराशा पंतने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ५७ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये अपयश जाफर पुढे म्हणाला, ‘‘पंतला सातत्याने धावा कराव्या लागतील आणि कामगिरीत सातत्य आणावे लागेल. आयपीएल २०२२ मध्येही त्याने आपल्याला साजेशी कामगिरी केलेली नाही. टी-२० मधील त्याची कामगिरी काही काळापासून संदिग्ध आहे. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वनडेतही त्याने काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत; परंतु हा यष्टिरक्षक फलंदाज टी-२० मध्ये सातत्याने अपयशी ठरला आहे, जी त्याच्या भविष्यासाठी चिंतेची गोष्ट आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

फक्त सिंधुताई माझी माईच नाही तर या निर्मिती संस्थांमध्येही गैरव्यवहार ! पारू फेम अभिनेत्याने नावंच जाहीर केली

Best Credit Cards For Women: महिलांसाठी बेस्ट आहेत 'हे' क्रेडिट कार्ड, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं आहे योग्य

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

SCROLL FOR NEXT