SA vs Ind ODI Series sakal
क्रीडा

SA vs Ind : ODI मालिकेसाठी बदलला टीम इंडियाचा कर्णधार; कधी अन् कुठे खेळला जाणार सामना; येथे पाहता येणार 'फ्री'

Kiran Mahanavar

SA vs Ind ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. दोन्ही संघ आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मालिकेतील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या संघात युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. पॉवर हिटर रिंकू सिंगचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघाची कमान एडन मार्करामच्या हातात आहे, ज्याने टी-20 मालिकेत प्रोटीज संघाचीही कमान सांभाळली होती.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना कधी, कोठे, किती वाजता खेळला जाणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर भारतीय वेळनुसार दुपारी 1:30 पासून खेळला जाईल, तर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना 4:30 वाजता खेळला जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण कुठे पहावे?

स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका 3 वनडे मालिका थेट सामने पाहू शकता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर कुठे बघायचे?

डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे सामने पाहू शकता. याशिवाय लाइव्ह अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या वेबसाईट https://www.esakal.com/krida ला फॉलो करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT