Rishabh Pant IND Vs SL sakal
क्रीडा

IND vs SL: ऋषभ पंतला टी-20 मध्ये मोठा धक्का! टीम इंडियातून बाहेरचा रस्ता ?

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियामध्ये मोठा बदल...

Kiran Mahanavar

Rishabh Pant IND Vs SL : पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला यंदाच्या टी-20 फॉरमॅटमध्ये खराब कामगिरीचा फटका सहन करावा लागणार आहे. पंतला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. टीम इंडिया आता इशान किशन आणि संजू सॅमसनला जास्तीत जास्त संधी देणार आहे.

बांगलादेशविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. पण आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पंतला टी-20 फॉरमॅटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकातील अपयशानंतर आता बीसीसीआयने कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. यामुळे ऋषभ पंतला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

पंतला आतापर्यंत 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यांमध्ये पंतने 22 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंतचा स्ट्राईक रेटही विशेष राहिला नाही. पंतने केवळ 126 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर पंतला आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये केवळ तीन अर्धशतकं झळकावता आली आहेत.

खराब कामगिरीनंतरही पंतला अधिक संधी मिळाल्याने बीसीसीआयलाही टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र आता बीसीसीआय इतर पर्यायही आजमावेल त्यामुळे संजू सॅमसन आणि इशान किशनला अधिक संधी दिली जातील. संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघेही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रणजी ट्रॉफीदरम्यान संजू आणि किशन बॅटने धावा करत आहेत. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत संधी मिळण्याची खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT