ind vs sa t20 aakash chopra 
क्रीडा

Ind Vs Sa T20: आकाश चोप्राची भविष्यवाणी, टीम इंडिया जिंकणार टी-20 मालिका?

मालिका आधीच नेहमीप्रमाणे भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Kiran Mahanavar

Ind vs Sa t20 Aakash Chopra: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिका आधीच नेहमीप्रमाणे भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे. यावेळी भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. आकाशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर या मालिकेबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले आहे. ही टी-20 मालिका कोणता संघ जिंकणार हे देखील सांगितले आहे.

आकाश चोप्रा म्हणाला की, या मालिकेसाठी सर्वाधिक स्कोअर दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक असणार आहे, तर भारतासाठी केएल राहुल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी सलामी करणारे हे दोन्ही फलंदाज या मालिकेमध्ये पण चांगलीच रंग दाखवणार आहे, असं अंदाज चोप्राने व्यक्त केल. त्याचबरोबर कागिसो रबाडा या टी-20 मालिकेत सर्वाधिक विकेट घेणार आहे. भारताविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये रबाडाने आतापर्यंत चारच विकेट घेतले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या मालिकेत 'मॅन ऑफ द मॅच' होणार असा अंदाज चोप्राने लावला आहे.

आकाश चोप्राने नेहमीप्रमाणे आपला अंदाज लावला आहे. 5 सामन्यांची टी-20 मालिका कोणता संघ जिंकणार हे त्याने सांगितले आहे. या मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकाकडून मोठी टक्कर मिळणार आहे. तरी हे भारतीय संघ ही मालिका 3-2 ने जिंकणार आहे. असा विश्वास आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, वायने पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वेन डेर डूसेन, मार्को जानसेन.

टीम इंडिया: केएल राहुल, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT