IND Vs SA WC 2023 Virat Kohli watching Pakistan Vs New Zealand match while having the haircut photo goes viral  
क्रीडा

Virat Kohli Birthday: वर्ल्डकप फिव्हर! 'बर्थडे बॉय' कोहलीला केस कापतानाही आवरला नाही PAK Vs NZ मॅच पाहाण्याचा मोह

आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रंगणार आहे.

रोहित कणसे

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम हॉटेलमध्ये केस कापून घेतले. आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रंगणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला गेला. पाकिस्तानने पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना जिंकून विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीत पोहचण्याची आशा जीवंत ठेवल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या दिवशी विराट कोहली आपला 2023 वा वाढदिवस देखील साजरा करत आहे. वाढदिवसापूर्वी केस कापण्यासाठी गेलेला विराट कोहली मोबाईलवर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा आनंद घेताना दिसला. विराटचा हा सामना पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत, तर ऑस्ट्रेलिया पात्र ठरणे जवळपास निश्चित आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ म्हणून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात कडवी स्पर्धा होऊ शकते. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया हा एकमेव असा संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

दक्षिण आफ्रिका सध्या दमदार फॉर्ममध्ये असून अशा परिस्थितीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अतिशय रोमांचक ठरू शकतो.

विराटच्या वाढदिवसाबद्दल बोलायचे झाले तर तो भारताच्या विजयासह त्याला आणखी खास बनवू इच्छितो. विराट कोहलीच्या खात्यात 48 वनडे शतके आहेत आणि जर त्याने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले तर तो वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल. गेल्या तीन सामन्यांत दोनवेळा शतकाच्या जवळ पोहोचून विराट बाद झाला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 95 आणि श्रीलंकेविरुद्ध 88 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT