wankhede stadium new corona virus guidelines in mumbai india vs sri lanka cricket news 
क्रीडा

IND vs SL: कोरोनाची भीती वाढली! श्रीलंकेविरुद्ध मालिकेआधी BCCI च्या नव्या गाईडलाईन्स

टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून कोरोना विषाणूच्या नवीन संसर्गामुळे...

Kiran Mahanavar

IND vs SL 1st T20 2023: श्रीलंकेचा क्रिकेट संघ वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. जिथे दोघांमध्ये पहिल्या 3 सामन्यांची टी-20 आणि नंतर ODI मालिका तितक्याच सामन्यांची खेळली जाणार आहे. 3 जानेवारीला टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कोरोना विषाणूच्या नवीन संसर्गामुळे मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. काही देशांतून येणाऱ्या लोकांसाठी पुन्हा आरटी पीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी २० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ज्यासाठी पेटीएम इनसाइडरवर तिकीट विक्री सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर काही नियम पुन्हा लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांची संख्येवर जरी मर्यादा नसल्या तरी मास्क घालणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, ज्येष्ठ व्यक्तींना आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना प्रवेश नाकारण्यात येईल.

बीसीसीआय क्रिकेटपटूंसाठी जुने नियम देखील लागू करू शकते, जसे की प्रेक्षकांच्या जवळ न जाण्याचा सल्ला. खेळाडूंना त्यांच्यासोबत फोटो काढू नका आणि बाहेरील व्यक्तींना भेटू नका असे सांगितले जाऊ शकते. मुंबईत कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी गेल्यास मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियोजन करा, असे आवाहन बीएमसीने केले आहे.

वारंवार हात धुवा आणि स्वच्छतेची काळजी घ्या. जर एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे असतील तर त्याने घराबाहेर पडू नये. वृद्धापकाळाने आणि इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: “पंचहात्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..”; मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ! कुणाला दिला सल्ला?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

Pune News : रात्रीतून शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात; पुणे पालिकेकडून १४७२ कर्मचारी, २१३ वाहनांचा वापर

Satara Accident: उलटा धबधबा पाहायला गेलेला युवक मोटारीसह ३०० फूट खाेल दरीत; जखमी युवक वेदनेने ओरडत होता अन् पोलिस...

Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

SCROLL FOR NEXT