ind vs sl 1st t20 highlights how india won match in the last overs axar patel
ind vs sl 1st t20 highlights how india won match in the last overs axar patel  sakal
क्रीडा

IND vs SL: 19व्या षटकात टीम इंडियाने पुन्हा खाल्ली माती! शेवटी अक्षरने फिरवली जादूची कांडी

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st T20 Highlights : भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी पहिला टी-20 सामना खेळल्या गेला. टीम इंडियाने कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजयाने नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला, एकवेळी श्रीलंका येथे जिंकेल असे वाटत होते, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात अखेर भारतीय संघाने बाजी मारली.

आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकादरम्यान डावातील 19 वे षटक अनेक वेळा टीम इंडियासाठी खलनायक ठरले आहे. भारताने 19व्या षटकातच अनेक सामने गमावले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्येही असेच घडले, जेव्हा हर्षल पटेलने 19व्या षटकात धावा लुटल्या आणि सामना टीम इंडियाच्या हातातून निघून जाईल असे वाटत होते.

श्रीलंकेच्या डावाची 18 षटके संपली तेव्हा विजयासाठी त्यांना 12 चेंडूत 29 धावा हव्या होत्या. अशा स्थितीत टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल अशी अपेक्षा होती, कारण श्रीलंकेने आधीच 8 विकेट गमावल्या होत्या. पण हर्षल पटेलने 19व्या षटकात 16 धावा दिल्याने भारतीय गटात तणाव वाढला होता. आता श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या षटकात फक्त 13 धावांची गरज होती.

कर्णधार हार्दिक पांड्याने येथे सट्टा खेळला आणि शेवटचे षटक अक्षर पटेलला दिले. हार्दिक पांड्याला थोडा ताण पडल्यामुळे अक्षरला संधी देण्यात आली. हा विश्वास सार्थ ठरवत त्याने शेवटच्या षटकात 13 धावा वाचवल्या. शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला विजयासाठी 4 धावांची गरज होती, मात्र त्याला केवळ एक धाव करता आली आणि भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला.

  • 19.1 - अक्षरने वाइड बॉल टाकला.

  • 19.1 - रजिथाने एक धाव घेतली.

  • 19.2 - करुणारत्ने डॉट बॉल खेळला.

  • 19.3 - करुणारत्नेने षटकार मारला.

  • 19.4 - अक्षरने पुन्हा डॉट बॉल टाकला.

  • 19.5 - कसून रजिथा धावबाद

  • 19.6 - करुणारत्ने धावबाद

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 162 धावा केल्या. शेवटी श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 160 धावा करू शकला आणि सामना 2 धावांनी गमावला. भारताकडून शिवम मावीने पदार्पण करताना 4 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT