IND vs SL 1st T20 Live Streaming 
क्रीडा

IND vs SL: सब्सक्रिप्शन संपलयं?, भारत-श्रीलंका सामना 'येथे' पाहू शकता फुकटात

Kiran Mahanavar

IND vs SL 1st T20 Live Streaming: भारतीय संघ 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. दोघांमध्ये 3 टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये 3 जानेवारी 2023 पासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारीला होणार आहे. यानंतर 10 ते 15 जानेवारी दरम्यान दोघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सर्वप्रथम संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे दिले जाऊ शकते. याशिवाय ईशान किशन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी आणि पृथ्वी शॉ यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल, तुम्ही त्याचे थेट प्रक्षेपण आणि विनामूल्य कुठे पाहू शकाल. चला तर मग जाणून घेऊया....

तुम्ही येथे सामना फुकटात पाहू शकता!

या मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्रीसह स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर प्रसारित केले जातील. त्याच वेळी या दोन्ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केल्या जातील, जिथे तुम्हाला त्या हिंदी आणि इंग्रजी समालोचनासह विनामूल्य पाहता येतील.

भारत विरुद्ध श्रीलंका 2023 पूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-20 सामना - 3 जानेवारी 2023 (मंगळवार) - मुंबई - संध्याकाळी 7

  • दुसरा टी-20 सामना - 5 जानेवारी 2023 (गुरुवार) - पुणे - संध्याकाळी 7

  • तिसरा टी-20 सामना - 7 जानेवारी 2023 (शनिवार) - राजकोट - संध्याकाळी 7 वाजता

  • पहिला एकदिवसीय सामना - 10 जानेवारी 2023 (मंगळवार) - गुवाहाटी - दुपारी 2 वा.

  • दुसरा एकदिवसीय सामना - 12 जानेवारी 2023 (गुरुवार) - कोलकाता - दुपारी २

  • तिसरा एकदिवसीय सामना - 15 जानेवारी 2023 (रविवार) - तिरुवनंतपुरम - दुपारी 2 वा.

  • भारतीय टी-20 संघ -

    हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

  • भारतीय एकदिवसीय संघ -

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT