Ritika And Rohit Sharma Sakal New
क्रीडा

आरे कॉल बॅक करशील का? रितिकानं घेतली रोहितची फिरकी

सुशांत जाधव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरु आहे. न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडीजचाही दारुण पराभव केला. त्यानंतर रोहित ब्रिगेड श्रीलंकेविरुद्ध विजय धडाका कायम ठेवण्याच्या इराद्याने सज्ज झालाय. रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत: या मालिकेसाठी उत्सुक असल्याचे दाखवण्यासाठी संघासह आपले काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या फोटोला तर पसंती मिळते आहे. यावर रितिका सजदेह ( Rohit Sharma Wife Ritika Sajdeh ) हिने रोहितची फिरकी घेतल्याचे दिसते.

अगली बारी श्रीलंका की! या कॅप्शनसह रोहित शर्माने फोटो शेअर केला आहे. पण यावर रितिकाने त्याची फिरकी घेतली आहे. "ते ठीक आहे पण मला कॉल बॅक करणार होतास त्याच काय झाल?" असा प्रश्न रितिकाने या पोस्टवरील कमेंटमधून विचारला आहे. दोघांच्या चाहत्यांकडून या प्रतिक्रियेवर लाईक्सची बरसात होत आहे.

रोहित शर्मा हा विसराळू आहे. श्रीलंका दौऱ्यावर व्यस्त असलेल्या रोहितनं बहुतेक रितिकाला कॉल बॅक करतो, असे सांगितले असावे. पण तो नेमका तिला कॉल करायचे विसरला असणार त्यामुळेच रितिकाने त्याला पोस्टवरुन याची आठवण करुन दिल्याचे दिसते.

24 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला लखनऊच्या मैदानातून सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानावरील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेची सांगता ही कसोटी मालिकेनं होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर भारतीय संघाच्या टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहित शर्माच्या खांद्यावर आली.

त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला. त्यानंतर रोहित शर्मा वनडे संघाचाही कर्णधार झाला. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत त्याने वनडेचंही नेतृत्व केले. वनडे आणि टी-20 दोन्ही मालिकेत टिम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवला. हीच विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT