Deepak Chahar injury News Sakal
क्रीडा

IND vs SL :टीम इंडियाला धक्का, टी-20 मालिकेतून दीपक चहर आउट

सुशांत जाधव

Deepak Chahar injury News : घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. स्नायू दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत दीपक चहर दुखापतग्रस्त झाला होता. तो यातून सावरला नसून तीन सामन्यांच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. (IND vs SL India pacer Deepak Chahar ruled out of T20 Series Against Sri Lanka due to a hamstring injury)

पीटीआयने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) च्या अधिकाऱ्याच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, दीपक चहरने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय अकादमीत तो मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली फिटनेसची प्रक्रिया पूर्ण करेल. दीपक चहरच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. उप-कर्णधार जसप्रित बुमराह आधीच संघाला जॉईन झाला आहे. त्यामुळे संघाला दीपक चहरच्या रिप्लेसमेंटची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय संघासोबतच चेन्नई सुपर किंग्जसाठीही हा मोठा धक्का असेल. आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक बोली लावून चेन्नईने त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. चेन्नईने दीपक चहरसाठी 14 कोटी रुपये मोजले आहेत. आतापर्यंत कधीच चेन्नईने लिलावात 10 कोटीपेक्षा अधिक बोली एखाद्या खेळाडूवर लावली नव्हती. तो आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईपर्यंत फिट होणार का? हे पाहावे लागेल.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT